कोथरुडपुणे शहर

‘व्ही-कलेक्ट मेगा ड्राईव्ह’ ला प्रचंड प्रतिसाद


कोथरूड : नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी प्रभागातील नागरिकांच्या सोयीसाठी दर महिन्याच्या पहिल्या रविवारी कचरा संकलन मोहिम राबवितात. लॉकडाऊनमुळे या उपक्रमात चार महिन्यांचा खंड पडला. मार्चनंतर आँगस्ट महिन्यात झालेल्या मोहिमेला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

सकाळी १० पासूनच रीघ सुरू झाली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी चार तासांची वेळ निर्धारित करण्यात आली होती. सायकली, फर्निचर, ईवेस्ट पैकी अगदी वॉशिंग मशीन, डीश वॉशर,मोबाईल फोन, लँपटॉप इ. सामान आले. कोरे कपडे, खेळणी, चादरी, ब्रँडेड चपला-बूट वगैरे सामान जमा झाले.

एकूण चार टेंपो भरगच्च भरून सामान औंधला स्वच्छच्या सेंटरला रवाना झाले. “आपल्याला नको असलेल्या वस्तू आपल्यासाठी अडगळ ठरते. मात्र ती इतरांची गरज भागवू शकते. रीयुज- पुनर्वापर आणि रिसायकल- पुनर्चक्रीकरण ही शाश्वत विकासाच्या दृष्टीने टाकलेली पाऊले आहेत. त्यामुळे अशा मोहिमांना उत्तेजन दिले पाहिजे” असे माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.

लॉकडाऊनच्या काळात लोकांना घरी भरपूर वेळ उपलब्ध झाला. तो त्यांनी कारणी लावत आवराआवरी केली. म्हणून देण्यायोग्य सुस्थितीतले सामान काढून ठेवता आले. त्यामुळे मोहिम अधिक यशस्वी झाली. असेही त्यांनी सांगितले.
सकाळी १० ते २ या चार तासात सँनिटायझेशन, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत कपडे, ई-कचरा तसेच इतर सामान मिळून  तीन टन साहित्य जमा झाले.

या उपक्रमासाठी भारती निवास सोसायटीचे पदाधिकारी श्री. पटवर्धन, श्री. नातू तसेच स्वच्छ संस्थेच्या स्मिता, गौरव व इस्माईल व पुणे मनपाचे श्री शेळके व श्री. कसबे
यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये