पुणे शहर

अनेक गैर गोष्टींकडे झालेले दुर्लक्ष, गैरप्रकारांकडे डोळे झाक किंवा आशीर्वाद त्यातून ही दुरावस्था पुण्यावर ओढवली-खासदार मेधा कुलकर्णी

पावसाळ्यासाठीची आवश्यक कामे महापालिकेने तातडीने करावी ,पावसामुळे नागरिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी – खासदार मेधा कुलकर्णी

पुणे:अनेक विविध गैर गोष्टींकडे झालेले दुर्लक्ष, गैरप्रकारांकडे डोळे झाक किंवा आशीर्वाद त्यातून ही दुरावस्था पुणे शहरावर ओढवली आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी तसेच आगामी काळातील पावसाळ्यासाठीची आवश्यक कामे तातडीने कऱण्यात यावी अशी मागणी राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

कुळकर्णी म्हणाल्या, काल पावसामुळे पुण्यामध्ये खूप हाहाकार झाला. अनेक नागरिकांचे फोन आले. वेगवेगळ्या सोसायटीमधून, वस्त्यांमधून फोन येत होते. मी पुण्यात नाही. पण जसे जिथून फोन येत होते, तसे तसे त्या त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांशी त्या भागातील व्यवस्था सुधारण्यासाठी मी बोलत होते. परंतु मला या सगळ्यामुळे खूप खेद वाटतो की नागरिकांचे खूप नुकसान झाले.

ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले पाण्यात अडकली. भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली. वेळ वाया गेला. हे नुकसान भरून काढता येणारच नाही.  पण चीजवस्तूंचे जे नुकसान झाले, त्याची नुकसान भरपाई व्हावी,  अशी मी आग्रही मागणी करीत आहे आहे. अनेक ठिकाणी घराघरांमध्ये पाणी जाऊन टीव्ही, फ्रिज आणि इतर वस्तू खराब झाल्या आहेत. अर्ध्या तासाच्या पावसामुळे पाणी मीटर रूम पर्यंत गेले. यातून काहीही अनर्थ ओढवला असता.महानगरपालिकेने आणि यंत्रणांनी याची गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता होती.

Img 20240404 wa00162092919036315770776

आपत्कालीन परिस्थितीत मदतीची यंत्रणा कमी पडते आणि नागरिकांना स्वतःच एकमेकांच्या मदतीला धावावे लागले. महानगरपालिका पूर्णपणे अयशस्वी झाली हे पुन्हा एकदा उघड झाले आहे.  महानगरपालिका प्रशासनाने या सर्व व्यवस्था पुन्हा मुळापासून दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. मी वारंवार अशा अनेक विषयात आवाज उठवला आहे.

सर्वप्रथम अनधिकृत बांधकामांवर कारवाई करायला हवी. पावसाळी पाण्याची गटारे किती तरी ठिकाणी अस्तित्वात नाहीत, आहेत ती साफ नाहीत, काही ठिकाणी ड्रेनेज लाईन त्यात एकत्र झाल्या आहेत. त्या व्यवस्थित करायला पाहिजेत.
नदीपात्राची खोली वाढवायला पाहिजे.कित्येक ठिकाणी नाले बुजवले आहेत. यासारखं तर महापाप दुसरं नसेल. या सर्व गैरव्यवस्थांमुळे नागरिकांचे नुकसान झाले. लोकप्रतिनिधी म्हणून अनेक वेळा या संदर्भात मी मागण्या केलेल्या आहेत, आवाज उठवला आहे. ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक नाल्यांवर बांधकाम केले असतील आणि अन्य काही गैरप्रकार असतील, तिथे तिथे धडक कारवाई व्हायला हवी आहे.

जिथे नाल्याची रुंदी प्रायमू च्या अहवाला पेक्षा कमी आहे त्या ठिकाणी अपेक्षित रुंदी टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.पाणी जमिनीत पुरण्याची व्यवस्था कुठेही नाही त्यामुळे या संदर्भात एक धोरणात्मक निर्णय घेऊन सोसायटीतील अंतर्गत रस्ते मुख्य रस्ते महानगरपालिकेच्या व अन्य खाजगी इमारती यांमध्ये जमिनीमध्ये पाणी झिरपण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्याचा निर्णय महानगरपालिकेला करावा लागेल असे दिसते.तरी या सर्व विषयाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात अशी आग्रही मागणी करीत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

Fb img 1717736406280
Fb img 17176807055063452256632276440792
Img 20240606 wa00116415178194496147748
Img 20240609 wa00127580640034409053932
Img 20240607 wa00128459478484949832471
Img 20240607 wa00153684919149705913893
Img 20240607 wa00106155524562941881055
Img 20240606 wa00121276257491443928373
Img 20240404 wa00132425955639205292116

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये