पुणे शहर

शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यच्या वतीने थंडीपासून वाचण्यासाठी गरजूंना ब्लँकेटचे वाटप..

कोथरुड: पुणे शहरात सध्या कडाक्याची थंडी पडली असून या थंडीत निवारा नसलेले व रस्त्यावर पदपथावर राहणाऱ्यांचे हाल होऊ नयेत म्हणून कै.माधुरी गोविंद जाधव यांच्या जयंती निमित्त गरजू लोकांना ब्लँकेट, स्वेटर, कानटोपी या वस्तूंचे वाटप करण्यात आले.

शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी राज गोविंद जाधव, तेजस गाढवे, हिमांशू इंगोले, अनिकेत मांडके, अविनाश कंधारे, संकेत गाढवे, सिद्धांत पितळे, सुरज साठे, अदित्य भुमकर, मिथिल नगरे, निहाल शेख, विश्वास खवळे, दिग्विजय साळेकर, अदित्य देवरुकर आदी उपस्थित होते.

Img 20211129 wa0128

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये