अर्थजगत

LIC IPO Listing : एलआयसीची शेअर बाजारात डिस्काउंटसह लिस्टिंग; शेअर्सची कमकुवत सुरुवात

मुंबई : एलआयसीचा शेअर 8 टक्क्यांहून अधिक घसरणीसह सूचीबद्ध झाला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर शेअर इश्यू किमतीच्या तुलनेत 8.11 घसरला. एलआयसीचा शेअर आज 872 रुपयांवर सूचीबद्ध झाला. तर दुसरीकडे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएसईवर देखील शेअरमध्ये 8.62 टक्क्यांची घसरण दिसून आली. बीएसईमध्ये शेअर 867.20 रुपयांवर लिस्टिंग झाला आहे.

एलआयसीचा शेअर किरकोळ गुंतवणूकदारांना 904 रुपये तर विमाधारकांना खास सवलतीसह 889 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र आता एलआयसीचा शेअर 8 टक्क्यांहून अधिक घसरणीसह सूचीबद्ध झाल्याने त्याची किंमत 867.20 रुपयांवर पोहोचली आहे. याचा मोठा फटका हा गुंतवणूकदारांना बसला आहे. दरम्यान गुंतवणूकदारांमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण आहे. एलआयसीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल या आशेने अनेक जणांनी एलआयसीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली. मात्र एलआयसीचा शेअर घसरणीसह लिस्टिंग झाला त्यामुळे गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली आहे. एलआयसीची लिस्टिंग घसरणीसह झाली आहे. मात्र त्यात समाधानाची बाब म्हणजे शेअर्स खरेदीचा जोर वाढला आहे. येत्या काळात शेअर्स खरेदी आणखी वाढल्यास स्टॉकची किंमत 900 रुपयांच्या वर जाण्याची शक्यता आहे. विमाधारक तसेच एलआयसीचे कर्मचारी यांना शेअर खरेदीमध्ये सूट देण्यात आली होती. विमाधारकांना प्रति शेअर मागे 60 रुपयांची तर कर्मचाऱ्यांना प्रति शेअरमागे 45 रुपयांची सूट देण्यात आली होती. त्यामुळे जर शेअरची किंमत 900 पार पोहोचल्यास हे गुंतवणूकदार फायद्यात राहू शकतात.

Img 20220425 wa00101037196448559324394 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये