भरत सुराणा यांचा करोना योद्धा म्हणून सत्कार

महर्षीनगर : एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ.. या उक्तीप्रमाणेच मागील साधारण पाच ते सहा महिन्यांपासून सर्वच ठिकाणी याची प्रचीती येत आहे. पुण्यातदेखील या कोरोना नामक महामारीने विळखा घातलेलाच आहे. परंतु त्याला घाबरून न जाता माणुसकी जिवंत ठेवत. त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे काम काही समाजसेवक करत आहेत. नुसतेच प्रबोधन न करता प्रत्यक्षपणे मैदानात उतरून एखाद्या योध्या प्रमाणे लढाई काही योद्धे लढत आहेत आणि म्हणूनच कोरोना विरिद्ध लढाई जिकण्यास मदत होत आहे.
पुण्यातील जैन सोशल ग्रुप (जेएसजी) अश्या काही जैन समाजातील कोरोना वॉरीअर्सची कामाची दखल घेऊन त्यांचा सत्कार केला आहे. भरत सुराणा, हिरेन गाला, योगेश शाह, हार्दिक शेठ आणि राहुल मुथा या पाच कोरोना वॉरीअर्सचा पुण्यातील जैन सोशल ग्रुपच्या वतीने जेएसजी इंटरनेशनल फेडरेशनचे माजी अध्यक्ष शरद शाह, जेएसजी महाराष्ट्र रिजनचे प्रमुख राजेंद्र धोका व जेएसजी पुणे परिवार प्रमुख दिलीप चोरबेले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मागील पाच महिन्यांपासून पोलिसांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली त्यांच्यासाठी मागील शंभर दिवसांपासून रोज सकाळ संध्याकाळी काढा देणे. गरीब गरजू तसेच वस्ती पातळीवरच्या लोकांना अन्न्धन्य देणे, जेवणाचे पाकिटे देणे, मोफत सैनिटायझर पुरविणे. एखाद्या भागात पेशंट आढळला असता आजूबाजूचा परिसर औषध मारून स्वच्छ करून घेणे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना गरीब रुग्णांना जवळच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात जागा उपलब्ध करून देणे. पोलिस व डॉक्टरांसाठी काढा व चहा देणे. अनेक होम क्वरांटाईन रुग्णांना औषधे पुरविणे. अश्या अनेक प्रकारची कामे या कोरोना योद्ध्यांनी केली आहेत. स्वतःच्या जिवाची परवा न करता हे योद्धे समाजासाठी दिवसरात्र लढत होते.



