कोथरुड

महावितरण कार्यालयावर कोथरूडकरांची धडक

कोथरुड : महावितरण कडून नागरिकांना वाढीव वीज बिले येत असल्याने आज नागरिकांनी कोथरुड मधील रामबाग कॉलनीतील कार्यालयाबाहेर एकत्र जमत महावितरणच्या ढिसाळ कारभारचा निषेध करत वाढीव वीज बिल कमी झालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या.

यावेळी नागरिकांनी कार्यालय बंद पाडत अधिकाऱ्यांना या चुकीच्या बिलाबाबत जाब विचारला. यावेळी उपस्थित असलेले भाजपचे कोथरुड मतदार संघाचे सरचिटणीस दिनेश माथावड व सामाजिक कार्यकर्ते लखन साठे यांनी नागरिकांची बाजू मांडत तातडीने यावर तोडगा काढायचा मागणी केली. यावेळी संबधित अधिकाऱ्यांनी सांगितले की 
ॲव्हेरेज बिले निघाली आहेत. प्रत्येक बिलाची तपासणी करून निर्णय घ्यावा लागेल. या प्रसंगी संतप्त नागरिकांनी निषेध व्यक्त केला.  

दिनेश माथवड म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना वाढीव वीज बिलामुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ऑनलाइन पद्धतीने वीज बिले भरून देखील पुन्हा वाढीव वीज बिलांचा भुर्दंड नागरिकांच्या माथी मारला जात आहे. तरी याबाबत योग्य तो निर्णय तातडीने घ्यावा अन्यथा भाजप च्या वतीने आंदोलन करण्यात येईल.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये