पुण्यात दोन्ही डोस घेतलेले 80 टक्के लोक कोरोनाबाधित महापालिकेच्या आढावा बैठकीत समोर आली माहिती

पुणे : पुण्यातून कोरोना संदर्भातली एक मोठी बातमी समोर येत आहे. नुकतीच पुणे महापालिकेची कोरोना आढावा बैठक पार पडली. त्यात दोन्ही डोस घेतलेले 80 टक्के लोक कोरोनाबाधित होताना दिसत असल्याचं समोर आले आहे. या बैठकीत पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली.
27 डिसेंबर ते 1 जानेवारी या पाच ते सहा दिवसात पुण्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या आठ दिवसात पुण्यात ॲक्टिव्ह रुग्ण संख्या चौपट झाल्याचंही समजतंय. नव्याने बाधित झालेल्यांपैकी लसीकरण झालेल्यांची माहिती घेतली जातं असून 80 टक्के लोक दोन्ही डोस घेतलेली बाधित होताना दिसत असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आढावा बैठकीत सांगितलं आहे.

गेल्या 8 दिवसात वाढलेल्या रुग्ण संख्येचा आढावा घेतल्याचं त्यांनी सांगितलं असून महापालिका त्या अर्थानं सुसज्ज असल्याचंही महापौर मोहोळ यांनी म्हटलं आहे.जम्बोचे स्ट्रक्चरल ॲाडिट केले आहे. 24 तासात मशिनरी सुरु होईल याचे नियोजन केलं असून गरज भासल्यास सुरु होणार, असंही ते म्हणालेत. तसंच 80 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर 340 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती महापौरांनी कोरोना आढावा बैठकीत दिली.
निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात येणार असून क्वारंटाईनसाठी पुन्हा हॅाटेल सुरु करणार असल्याचंही ते म्हणालेत. तसंच लसीकरण राहिलेल्या लोकांपर्यंत तातडीने पोहोचण यासाठी प्राधान्याने प्रयत्न केला जाणार असल्याचंही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.



