पुणे शहर

पुण्यात गुन्हेगाराला पकडायला गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला

पुणे : कोतेवस्ती येथे रात्री साडेनऊच्या सुमारास एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर पोलिसांना स्वत:च्या रक्षणार्थ हवेत गोळीबार करावा लागला. जमावाच्या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा येथील कोते वस्ती येथे सर्वधर्मसमभाव नावाची म्हाडाची वसाहत आहे. शक्‍तीसिंग सुरजसिंग बावरी (वय. 22) नावाचा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी साथीदारांच्या मदतीने या परिसरातील नागरिकांना त्रास देत होता. नागरिकांची ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर येरवडा पोलीस ठाण्याचे पथक शक्‍तीसिंग याला पकडायला गेले. त्यावेळी त्याने एका समाजाच्या जमावाला भडकावले.

जमाव पोलिसांवर चालून जाऊ लागला. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. जमाव पांगल्यावर पोलिसांनी शक्तीसिंगला ताब्यात घेतले. या घटनेत एक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाला. दरम्यान, याप्रकरणी येरवडा पोलीस तपास करत आहेत.

Screenshot 20211227 1402344603556305344739789

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये