पुणे शहर

गिरीश बापट, संदीप आठवले यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिकेचे लोकार्पण ; राघवेंद्र मानकर मेडिकल फाउंडेशनचा उपक्रम..

पुणे : खासदार गिरीश बापट यांनी केलेल्या समाज व लोकोपयोगी कामांचा वारसा पुढे चालविला पाहिजे. बापू मानकर यांनी रुग्णवाहिका सुरु करून बापट यांच्या मनातील गोष्ट साकारली आहे , असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी व्यक्त केले.

राघवेंद्र ( बापू ) मानकर मेडिकल फाउंडेशनतर्फे खासदार गिरीश बापट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक संदीपजी आठवले यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली .या कार्यक्रमात पाटील प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते खासदार बापट यांच्या पत्नी गिरिजा बापट , मुलगा गौरव बापट , तसेच प्रकाश आठवले आणि त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.

Img 20230424 wa0022

पाटील म्हणाले , बापट यांचा लोकसंपर्क आणि कार्य मोठे होते. तिघाचौघांनी मिळून ते पुढे नेले पाहिजे. त्यातील एक नाव हे बापू मानकर यांचे आहे . बापट यांचा वारसा पुढे नेण्याचे काम मानकर व त्यांचे सहकारी करतील. गौरव बापट म्हणाले मी लहानपणी संघाच्या शाखेवर जात होतो तेव्हा संदीपजी आठवले आमचे शिक्षक होते .त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात झोकून दिले. आठवले आणि माझे बाबा यांच्या स्मरणार्थ मानकर यांनी ही रुग्णवाहिका लोकार्पण केली . त्याबाबत त्यांना मी धन्यवाद देतो.

Img 20221126 wa02126927299965323449855 1

बापू मानकर म्हणाले बापट यांच्या सानिध्यात गेल्या आठ नऊ वर्षे असताना त्यांनी आम्हाला विविध बाबतीत मार्गदर्शन केले. कोरोना साथीच्या काळात वैद्यकीय अडचणी जाणवल्या त्यामुळे बापट आणि आठवले यांच्या स्मरणार्थ फाउंडेशनच्या वतीने आम्ही रुग्णवाहिका लोकार्पण केली. प्रकाश आठवले म्हणाले संदीपजी आठवले यांनी कोकण , कोल्हापूर येथे प्रचारक म्हणून काम केले. मुंबईत संघाचे प्रांत प्रचार म्हणून काम पाहिले. गेले साठ वर्षे बापट आणि आठवले यांचे कौटुंबिक संबंध आहे. अमित कंक यांनी सूत्रसंचालन केले. फाउंडेशनच्या वतीने सोमनाथ भोसले यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये