पुणे शहर

दिव्यांग दिनानिमित्त “सन्मान संघर्ष योद्ध्यांचा” कार्यक्रमाचे विरेश शितोळे यांच्याकडून आयोजन..

कर्वेनगर : दिव्यांग व्यक्ती शारीरिक त्रुटींवर मात करून  जीवनात करीत असलेला संघर्ष हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. म्हणूनच जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधत विरेश गोरखनाथ शितोळे  यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सन्मान संघर्ष योद्ध्यांचा या कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींचा भेटवस्तू व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दीक्षा धिंडे, अभिनेता रमेश परदेशी, सत्कर्म दिव्यांग फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश मालवीय, गणेश भोकरे, आंबेडे काका, संकेत शितोळे, संतोष आंबेडे, जय खत्री आदी उपस्थित होते. 

दोन्ही पाय नसताना गडकिल्ले चढणाऱ्या आकाशने सांगितलेली त्याची जीवन कहाणी सर्वांसाठीच प्रेरणादायी होती. दिव्यांग बांधवांना आपल्या सहानुभूतीची नाही, तर आपल्या विश्वासाची व प्रोत्साहनाची आवश्यकता आहे. माझ्या सर्व दिव्यांग बंधू भगिनींना प्रोत्साहन देण्यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे विरेश शितोळे यांनी यावेळी सांगितले.

Img 20211129 wa0128

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये