पुणे शहर

चांदणी चौक मेट्रो स्थानकासाठी नियोजनबद्ध पादचारी मार्ग अंतर्भूत करा..

माजी नगरसेविका अल्पना वरपे यांची मागणी..आमदार भीमराव तापकीर यांच्या उपस्थितीत मेट्रो अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा..

कोथरूड : वनाज ते चांदणी चौक या मेट्रो मार्गावरील काम लवकरच सुरू होणार आहे. सदर मार्गावरील चांदणी चौक येथे होणाऱ्या मेट्रो स्टेशनला सुसंगत असणारा पादचारी मार्ग असणे खूप गरजेचे आहे. त्या अनुषंगाने पादचारी मार्गाचे नियोजन करून तो करण्यात यावा अशी मागणी माजी नगरसेविका अल्पना वरपे व भाजप खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष गणेश वरपे यांनी केली आहे.

या मागणीचे निवेदन वरपे यांच्याकडून महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे देण्यात आले आहे. या संदर्भात व वनाज ते चांदणी चौक मेट्रो मार्ग व कोथरूड डेपो आणि चांदणी चौक या ठिकाणी होणाऱ्या मेट्रो स्टेशन बाबत पुणे महामेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर यांच्याबरोबर आमदार भीमराव तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली सकारात्मक चर्चा झाली आहे. यावेळी पादचारी मार्गाची विशेष काळजी घेतली जाणार असल्याचे हर्डीकर यांनी सांगितले आहे.

या प्रसंगी स्वतः खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार  भीमराव तापकीर, खडकवासला मतदारसंघ पश्चिम मंडल चे अध्यक्ष गणेश वरपे, माजी नगरसेविका अल्पना गणेश वरपे आदी उपस्थित होते.

Img 20251125 wa00126624322614302660332

गणेश वरपे म्हणाले, सदर स्टेशनचा बावधन परिसर व मुळशी भागातून येणाऱ्या नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर वापर होईल. परंतु सद्य स्थितीत चांदणी चौक येथे असणाऱ्या बहुमजली उड्डाणपूल येथे पादचारी मार्ग नसल्याने नागरिकांची खूप गैरसोय होत आहे. त्यामुळे नॅशनल हायवे ऑथोरीटीकडून (NHAI) कडून या ठिकाणी पादचारी मार्गाचे काम करण्यात येणार असून त्याच मार्गाला अनुसरून सदर मेट्रो स्टेशनला जोडणाऱ्या पादचारी मार्गाचे काम करणे गरजेचे आहे.

सदर स्टेशन हे पुणे शहराच्या पश्चिम प्रवेशद्वारवर होत असल्याने या मेट्रो स्थानकांचा उपयोग भविष्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक करणार आहेत. चांदणी चौक येथील मेट्रो स्थानकाजवळ पादचारी मार्गाची (फुटपाथची) सोय अंतर्भूत केल्याने प्रवाशांना रस्त्यावरून चालत जावे लागणार नाही. तसेच विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत अनेक नागरिक मेट्रो स्थानकांपर्यंत पायी सुरक्षित येऊ शकतील.  त्यामुळे पादचारी मार्गांची आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
तरी आपण या बाबीचा सकारात्मक विचार करून चांदणी चौक मेट्रो स्थानकासाठी पादचारी मार्ग (फुटपाथ) अंतर्भूत करावा अशी भूमिका गणेश वरपे यांनी मांडली आहे.

Img 20250508 wa00015038950216212096978

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये