महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोथरूड आयोजित शिवशाहीर करंडक वत्कृत्व स्पर्धेत एकाच दिवशी ११८ स्पर्धकांचा समावेश

पुणे : पदमविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या १०० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सन्माननिय राजसाहेब ठाकरे यांच्या सूचने नुसार मनसे कोथरूड विभागाच्या वतीने भव्य वत्कृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. कोथरूड विभातून ११८ स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. अशी माहिती मनसे विभाग अध्यक्ष सुधीर धावडे यांनी दिली.
कोथरूड येथील अंबर हॉल येथे आज ही स्पर्धा पार पडली. मनसेचे रामभाऊ बोरकर, रमेश परदेशी यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मनसे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागस्कर, शहर अध्यक्ष वसंत मोरे, गणेश सातपुते, नरेंद्र तांबोळी, संतोष पाटील आदी वरीष्ट पदाधिकारी उपस्थित होते. युवा शिवशाहीर व व्याख्याते सौरभ कर्डे, अभिनेते योगेश सुपेकर, शैलेश जोशी, सुरेखा होले, प्रशांत कनोजिया, अमोल शिंदे, मंदार बलकवडे आदी उपस्थित होते.
स्पर्धे मध्ये ३ वर्षाची छोटी स्पर्धक पासून ते ७५ वर्षांच्या आजोबांनीही सहभाग घेतला. अनेक स्पर्धक पारंपरिक पद्धतीने वेशभूषा परिधान करून आले होते ज्यांनी पूर्ण स्पर्धा शिवमय केली.स्पर्धेची ही प्राथमिक फेरी होती. महाअंतिम फेरी ही दिनांक ४ सप्टेंबर रोजी मा.राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र सैनिक विराज डाकवे, हर्षद खाडे, किरण उभे, संतोष वाघमारे, श्रीयश राऊत, अशोक कदम, हितेश कुंभार, भाऊसाहेब पाटील, शाम बोऱ्हाडे, सचिन विप्र, प्रसाद गोखले, सागर भगत सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.



