कोथरुड

दृष्टीहीन धनंजयला व्यवसायासाठी संतोष डोख यांच्याकडून सहाय्य

खा. वंदना चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आली मदत

कोथरूड  : खासदार वंदना चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त संतोष डोख व दिपाली डोख यांच्या वतीने किष्किंधानगर येथील दृष्टीहीन असलेल्या धनंजय परमाळे याला व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी सहाय्य करण्यात आले.

सावभिमनाने जगता यावे यासाठी अगरबत्ती विकण्याचे काम धनंजय करणार आहे. यावेळी कमिन्स इंडिया लिमिटेडचे व्हाईस मॅनेजर अनिलजी मंद्रूपकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संतोष मोहोळ, विजय ठोंबरे,  गणपत जोरी, श्यामराव भिलारे, बाळकृष्णजी निढाळकर उपस्थित होते.

यावेळी अनिल मंद्रूपकर यांच्या वतीने धनंजय यांस रेनकोट व्यवसायासाठी साहित्य भेट देण्यात आले. दृष्टीहीन असला तरी धनंजयने स्वाभिमानी आयुष्य स्वीकारलं. याचं त्याच्या गुणानं आम्ही सर्वजण प्रेरित झालो आहोत. यासंदर्भात त्यास जी मदत लागेल, ती करण्यास त्याचा एक भाऊ अथवा मित्र म्हणून मी सदैव तत्पर असेन, असे प्रतिपादन यावेळी संतोष डोख यांनी केले.

Img 20220708 wa00011330202002021897215

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये