जीवनात मैत्रीच्या नात्याची जपणूक आवश्यक : दीपक मानकर

कोथरूड मैत्री व्यासपीठच्या मेळाव्यात बहरला मैत्रीचा रंग
कर्वेनगर : कर्वेनगरमध्ये आज सर्व पक्षीय कोथरूड मैत्री व्यासपीठचा स्नेह मेळावा पार पडला. यावेळी गप्पा आणि गाण्यांच्या मैफलीतून मैत्रीचा रंग चांगलाच बहरला. उपस्थित सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात विचारांची देवाण घेवाण होत पक्ष विरहित चर्चा पार पडली.
आज पार पडलेल्या सर्व पक्षीय कोथरुड मैत्री व्यासपीठाच्या स्नेह मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर व मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रत्ना हॉटेल मधील हॉल मध्ये मैत्री व्यासपीठचे सदस्य विनोद मोहिते, सचिन विप्र, अजय भुवड यांनी आजच्या स्नेह मेळाव्याचे नियोजन केले होते.
यावेळी बोलताना दीपक मानकर म्हणाले, आपण जरी विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून सामाजिक काम करत असलो तरी, मैत्रीच्या नात्याची जपणूक करणे आवश्यक आहे. धकाधकीच्या व्यस्त जीवनात आपण हसणं विसरून गेलो आहे, पण मित्रांमध्ये काही क्षण घालवले की जीवनातील ताण , दुःख निघून जाते म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्रीला फार महत्व आहे. कोथरूड मैत्री व्यासपीठ च्या माध्यमातून सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते एक येऊन मैत्रीचे नाते जपत आहेत हे कौतुकास्पद आहे.

साईनाथ बाबर म्हणाले अशा प्रकारे सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते कोथरूड मैत्री व्यासपीठच्या माध्यमातून एकत्र येत मैत्री चे नाते जपत हे शहरातील एकमेव उदाहरण आहे. सर्वांनी आदर्श घ्यावा असा हा मैत्री व्यासपीठचा उपक्रम आहे.
यावेळी दीपक मानकर यांनी तेरे जैसा यार कहाँ हे मैत्रीवर आधारित गीत गाऊन आजच्या कार्यक्रमात बाहेर आणली त्यानंतर विजय डाकले यांनी रोते हुए आते है सब हे गीत सादर केलं. आजय मारणे यांनी हम होंगे कमयाब, श्रीपाद चीकणे यांनी शोधिसी मानवा तर संदीप कुंबरे यांनी जिंदगी की ना टूटे लडी हे गीत सादर करून कार्यक्रमात रंग भरले. मैत्रीपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी नितीन शिंदे, गणेश वरपे, गणेश शिंदे, विजय डाकले, नवनाथ जाधव, गोविंद थरकुडे, विशाल भेलके, उमेश भेलके, संदीप मोकाटे, रमेश उभे, किरण उभे, श्रीपाद चिकणे, विठ्ठल बराटे, चेतन भालेकर, प्रशांत हरसूले, दीपक दुधाने, संतोष अमराळे, सचिन मोकाटे, राजाभाऊ जोरी, किशोर सोनार, नंदकुमार गोसावी, योगेश राजापुरकर, किशोर मारणे, गिरीश खत्री, संतोष सुर्वे, तुकाराम जाधव संतोष घारे, संदीप मोरे, योगेश मारणे, वैभव मुरकुटे, तसेच पत्रकार अमोल साबळे, विनायक बेदरकर, जितेंद्र मैड, सागर जगताप, सागर येवले, दीपक पाटील उपस्थित होते.









