क्रीडा

“जनसुरक्षा क्रिकेट चषक” स्पर्धेचे लोहगाव इलेव्हन विजेते

पुणे- पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विमानतळ पोलीस स्टेशन यांनी सिम्बॉयसिस कॉलेज ग्राउंड विमान नगर येथे “community policing – connectin yuths” या उपक्रमा अंतर्गत “जनसुरक्षा क्रिकेट चषक 2025” या स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट चषक स्पर्धेचे उद्घाटन सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.

Img 20250329 wa00152303552551906093819 1


स्पर्धेमध्ये परिमंडळ-4 मधील एकूण 16 संघानी सहभाग नोदवला. त्यामध्ये परिमंडळ 4 मधील विमानतळ, खराडी, वाघोली, येरवडा, विश्रांतवाडी, खडकी, बाणेर पोलीस स्टेशनच्या संघांसोबतच “अखिल पत्रकार महासंघ संघ पुणे” यांनी देखील सहभाग घेतला होता. विमाननगर परिसरातील स्थानिक 8 नामवंत क्रिकेट संघांनी देखील या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक -लोहगाव इलेव्हन, द्वितीय क्रमांक- जे बॉईज क्रिकेट संघ,रामवाडी, तृतीय क्रमांक- विमानतळ पोलीस स्टेशन क्रिकेट संघ यांनी पटकावला.विजेत्या संघांना अनुक्रमे रुपये 21हजार, ,11हजार,7 हजार व चषक पारितोषिक पोलीस आयुक्तांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. मालिकावीर म्हणून विमानतळ पोलीस स्टेशन संघाचे कर्णधार सपोनी विजय चंदन, उत्कृष्ट फलंदाज गणेश इथापे ,उत्कृष्ट गोलंदाज अरविंद ठाकूर (जे.बॉईज संघ) यांना गौरविण्यात आले.

Screenshot 20250327 192122 samsungnotes6439383861966424262
Img 20250329 wa0017723421253962858300

या क्रिकेट स्पर्धांच्या बक्षीस वितरण पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. पोलीस आयुक्तांनी यावेळी स्पर्धेत सहभागी खेळाडू व नागरिक यांच्याशी संवाद साधून मनोगत व्यक्त केले. पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलिस स्टेशन अजय संकेश्वरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस रवींद्र शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खराडी संजय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदननगर श्रीमती सिमा ढाकणे मॅडम, पोलीस निरीक्षक गुन्हे विमानतळ श्रीमती आशालता खापरे यांच्या सह हर्षवर्धन गाडे व विमान नगर परिसरातील प्रतिष्ठित नागरिक कार्यक्रमासाठी उपस्थित होते. पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.

Img 20250329 wa00188366800036709774384
Img 20250310 wa02282851203640248970727

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये