अकलूजच्या महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीगचा डीएसपी पिंपरी चिंचवड विजेता

अकलूज : मिशन आयुर्वेद, महाराष्ट्र राज्य व सोलापूर जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अकलूज (ता.माळशिरस) येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात झालेल्या महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग Maharashtra doctors premier league पाच दिवसीय क्रिकेट स्पर्धेमध्ये डॉ.शकील पठाण यांच्या डीएसपी पिंपरी चिंचवड या संघाने ट्रॉफीसह 51 हजार रुपयांचे पहिले बक्षीस मिळवले,

स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक 31 हजार रुपये व विजेता कप परभणीच्या डॉ.शंकर वंजारी यांच्या महाराष्ट्र किंग्जने पटकावले , तृतीय पारितोषिक 21 हजार रुपये व विजेता कप डॉ.विकास स्वामी यांच्या सोलापूर डॉक्टर्स वॉरियर्स या संघाने मिळवले.



महिला विभागामध्ये प्रथम क्रमांक पुण्याच्या डॉ. स्वप्ना दंगमाळी यांच्या गेम चेंजर,पिंपरी चिंचवड या संघाने रोख रक्कम 21000 व विजेता कप पटकावला ,द्वितीय क्रमांक सोलापूरच्या डॉ. शर्वरी आयाचित यांच्या निमा संघाने रोख रक्कम 11000 व विजेता कप मिळवला तर अकलूजच्या डॉ.अर्चना गवळी यांच्या अकलूज वॉरियर्स या संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
पुरुषांच्या सामन्यामध्ये बेस्ट बॅट्समन, प्लेयर ऑफ द सिरीज व बेस्ट फिल्डरचा बहुमान पुण्याच्या डॉ.अविनाश गावडे यांना मिळाला, बेस्ट बॉलर डॉ.दिनेश चौगुले ठरला तर बेस्ट कॅचचा मान अकलूजच्या डॉ. अनिश शेख यांनी पटकावला.



महिला विभागात बेस्ट फिल्डर डॉ.अश्विनी देगावकार,बेस्ट बॅट्समन डॉ . स्नेहल जोशी, बेस्ट बॉलर डॉ. श्वेता बोबडे ,बेस्ट कॅच डॉ. छाया दगडे हे मानकरी ठरले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाळासाहेब हरपळे, भाजपा भटक्या विमुक्त जातीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ.उज्वला हाके ,मनसे वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अजय तायडे, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे उपाध्यक्ष डॉ.बाळकृष्ण गायकवाड, एमसीआयएमचे सदस्य डॉ.तानाजीराव कदम, शिवसेना युवा नेते वीरेंद्र वाघमारे, माळशिरस तालुका काँग्रेस आय कमिटीचे तालुकाध्यक्ष सतीश पालकर , अपेक्स हॉस्पिटलचे संचालक डॉ.नितीन राणे, डॉ.रेवती राणे, डॉ.श्रीकांत देवडीकर, हृदयरोग तज्ञ डॉ.सौरभ गांधी, माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड , माळशिरस होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेचे अध्यक्ष डॉ.अभिजीत राजे भोसले, अकलूजचे होमिओपॅथी तज्ञ डॉ.आनंद देशमुख , आनंदनगरचे उपसरपंच वसंतराव गायकवाड, द्वारकाधीश सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.



अंतिम सामन्याची सुरुवात शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते मैदानाचे पूजन व नाणेफेक करून करण्यात आली.
प्रास्ताविकात डॉ बाळकृष्ण गायकवाड यांनी महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीगचे तिसरे वर्ष असून राज्यभरातून मोठ्या संख्येने डॉक्टर्स यात सहभागी झालेले आहेत. पारदर्शक, खेळाडूंना सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोई, राहण्याची, जेवणाची व्यवस्था यामुळे बाहेर गावचे पुरुषासह महीला डॉक्टरांचे संघ यामध्ये सहभागी होत आहेत. मिशन आयुर्वेद व सोलापूर जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेचे पदाधिकारी झोकुन देऊन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत असतात, त्यामुळे कमी काळात या स्पर्धेला मागणी वाढत असल्याचे सांगितले. माळशिरस तालुक्यातील प्रतिष्ठीत डॉक्टर्स या स्पर्धा उत्तमरित्या व्हाव्यात यासाठी आपापल्या परीने योगदान देत असतात, अशा सर्वांचे व वेळात वेळ काढून आलेल्या सर्व खेळाडूंचे आभार मानले.
भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाळासाहेब हरपळे यांनी व्याधीमुक्त जीवन जगण्यासाठी शारीरिक आरोग्य तंदुरुस्त असणे गरजेचे असून धकाधकीच्या जीवनामध्ये वैद्यकीय व्यावसायिकांना व्याधीमुक्त होण्यासाठी व्यायामाची गरज असून त्यांनी एखादा खेळ खेळला तर आपोआपच व्यायाम होईल ,त्यामुळे प्रत्येकाने खेळाची आवड जोपासली पाहिजे असे सांगितले .
भाजपा भटक्याविमुक्त आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा डॉ.उज्वला हाके यांनी पुरुषांच्या बरोबर महिलाही कमी नसून त्यांनी सुद्धा चूल मूल व फक्त प्रॅक्टिस न पाहता मैदानावर येऊन शारीरिक आरोग्य जपले पाहिजे व यासाठी खेळ हा महत्त्वाचा असून संघटित रित्या मैदानी खेळ खेळल्यास व्याधीमुक्त जीवन जगू शकतात असे सांगून मिशन आयुर्वेद व सोलापूर जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना यांनी भरवलेल्या स्पर्धेचे कौतुक केले.



मनसे वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अजय तायडे यांनी प्रत्येक डॉक्टराने छंद जोपासणे गरजेचे असून प्रत्येक छंदाबरोबर कुठल्याही खेळाची आवड जोपासली तर मानसिक ताण कमी होतो व रक्तदाब,मधुमेह या आजारापासून दूर राहतो .त्यामुळे प्रत्येकाने सकाळी उठून व्यायामाबरोबर योगासने, ध्यानधारणा करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिशन आयुर्वेदचे संस्थापक अध्यक्ष डॉ.हर्षवर्धन गायकवाड, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.अनिल बळते, सचिव डॉ.नागनाथ दगडे पाटील, उपाध्यक्ष डॉ.प्रशांत निंबाळकर, खजिनदार डॉ.तानाजीराव देवकाते , सदस्य डॉ.अनिस शेख, डॉ.नितीन कुबेर, डॉ. ऋषिकेश पाटील , डॉ.फैज सय्यद, डॉ.शिवाजीराव पणासे पाटील , डॉ.महावीर पाटील , डॉ अभिजीत मगर, डॉ वैभव कवीतके, महिला विभाग प्रमुख डॉ.छाया दगडे , सचिव डॉ.अर्चना गवळी यांनी कठोर मेहनत घेतली.
स्पर्धेमध्ये डॉ.प्रताप सोमवंशी, डॉ.शंकर वंजारी, डॉ.चेतन देवकाते, डॉ.प्रताप येडगे, डॉ.सयाजी देशमुख, डॉ.प्रद्युम्न सातव, डॉ.धनंजय सोडमिसे, डॉ.विशाल गायकवाड, डॉ.मनोज शिंदे, डॉ.उदय जाधव, डॉ.अनिस शेख, डॉ.स्वप्ना दंगमाळी, डॉ.शर्वरी आयाचीत, डॉ.उमा जोशी, डॉ.अर्चना गवळी यांच्यासह मुंबई , पुणे, कोल्हापूर, गोवा, रत्नागिरी , बारामती, फलटण, इंदापूर, दौड, सिंधुदुर्ग, जळगाव, परभणी, अहमदनगर, सोलापूर, लातूर ,बीड जळगाव , छत्रपती संभाजीनगर, अमरावती , नागपूर येथील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील सर्व खेळाडूंची राहण्याची, जेवणाची सोय संघटनेच्या वतीने करण्यात आली होती.
सीसीएमपी उत्तीर्ण डॉ.नितीन कुबेर,डॉ.चंद्रशेखर कोळेकर,डॉ.सचिन केमकर.डॉ.प्रभाकर शिंदे,डॉ.आयेशा मुजावर यांचा सत्कार मान्यवारांचे हस्ते करण्यात आला.
सूत्रसंचालन मिशन आयुर्वेदचे सचिव डॉ.मधुराव यांनी केले तर आभार उपाध्यक्ष डॉ.प्रशांत निंबाळकर यांनी मानले.



