वारजेतील कै. सुभद्रा प्रभाकर बराटे
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ७ डिसेंबरपासून नागरिकांच्या सेवेत

माजी नगरसेवक दिलीप बराटे यांची माहिती
वारजे : वारजे माळवाडी, गणपती माथा येथे नगरसेवक दिलीप बराटे यांच्या प्रयत्नातून पुणे महानगरपालिकेच्या वतीने उभा करण्यात आलेले कै. सुभद्रा प्रभाकर बराटे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बुधवार दि. ७ डिसेंबर २०२२ पासून नागरिकांच्या सेवेत सुरू होणार आहे.
या सुरू होत असलेल्या कै. सुभद्रा प्रभाकर बराटे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक सुविधा शासन दरामध्ये नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे दिलीप बराटे यांनी सांगितले.
या हॉस्पिटलमध्ये अंतर्गत औषध, हृदयरोग, सामान्य शस्त्रक्रिया, लॅप्रोस्कोपी (२ लॅमिनार फ्लोओटी), डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी आणि उपचारात्मक एंडोस्कोपी केंद्रीय ऑक्सिजनेशन आणि संपृक्तता प्रणाली, ऑर्थोपेडिक, स्पाइन सर्जरी, जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी, आर्थ्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, ट्रॉमा केअर (औद्योगिक आघात), न्यूरोलॉजी, केमोथेरपी, ऑन्कोलॉजी, डायलिसिस युनिट, फिजिओथेरपी, वेदना व्यवस्थापन, संपूर्ण तोंडावर उपचार रूट, कॅनाल उपचार, दात पांढरे करणे या सुविधा टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जाणार असल्याचे बराटे यांनी सांगितले.
कमी दरात नागरिकांना उपचार मिळावेत या हेतूने या हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे, त्या दृष्टीने हे हॉस्पिटल चालवण्यासाठी ट्रस्ट हेल्थ केअर फाउंडेशन च्या प्लॅटिनम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांना चालवण्यासाठी देण्यात आले आहे. बुधवार दि. ७ डिसेंबर २०२२ पासून २४ तास रुग्णांच्या सेवेत हे हॉस्पिटल सुरू राहणार आहे.




