सिनेजगत

VIDEO : ‘काजोल’ला या मराठी गाण्याने लावले ‘वेड’; म्हणाली “निस्वार्थ प्रेमापेक्षा…”

पुणे : बॉलिवूड अभिनेत्री काजोल देवगणला एका मराठी चित्रपटाच्या गाण्याने सध्या भुरळ घातली आहे. कलाविश्वातील लोकप्रिय रितेश देशमुख व जिनिलिया देशमुख ही जोडी ‘वेड’ या चित्रपटातून पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. याचा टीझर प्रदर्शित झाल्यावर काजोलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘वेड’ चित्रपटातील गाण्यांनाही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. रितेश-जिनिलियाच्या या चित्रपटातील ‘सुख कळले’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. चित्रपटातील इतर गाण्यांप्रमाणे हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. एवढंच काय बॉलिवूड अभिनेत्री काजोल देवगणलाही या गाण्याने भूरळ पाडली आहे.

काजोलने सुख कळले गाण्याचा व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. “निस्वार्थ प्रेमापेक्षा मोठं वेड काय असू शकतं?”, असं तिनं म्हटलं आहे. रितेश व जिनिलिया मुख्य भूमिकेत असलेला ‘वेड’ हा चित्रपट ३० डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून जिनिलिया मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये