
पुणे : कोथरूडमधील किष्किंधानगर परिसरातील नागरिकांनी अनियमित होत असलेल्या पाणी पुरवठ्या संदर्भात राष्ट्रवादीचे कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी या प्रश्नी लक्ष घालून ही समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून येथील पाणी प्रश्न आता मार्गी लागला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोथरूड मतदारसंघ अध्यक्ष हर्षवर्धन दीपक मानकर यांनी त्यानुसार तातडीने त्याठिकाणी जाऊन पाहणी करुन समस्येचे गांभीर्य लक्षात घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चाही केली. आणि पाणी प्रश्न मार्गी लावण्यात यश आले आहे.

मानकर म्हणाले, गेल्या दोन आठवड्यापासून किष्किंधानगर येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सतत पाठपुरावा करत होतो. अखेर प्रयत्नांना यश आले. नागरिकांना नियमित व पुरेसा पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी माझे वडील नगरसेवक दीपक मानकर यांच्या प्रयत्नातून व पुणे महापालिकेच्या निधीतून, किष्किंधानगर परिसरात 4 इंची पिण्याच्या पाण्याच्या लाईनचे काम आज सुरू करण्यात आले.
लवकरात लवकर हे काम पूर्ण केले जाणार असून नागरिकांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होणार आहे. हा प्रश्न सोडविण्यात सहकार्य करणाऱ्या पुणे मनपाच्या संबंधित अधिकार्यांचे मनापासून आभार मानतो.



