पुणे शहर

बावधन मध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याची कुणाल वेडे पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी..

बावधन :  जेष्ठ व्यक्तींना कोरोना संसर्गाचा धोका अधिक असल्या कारणाने त्यांचे लसीकरण हे वेळेवर होणे गरजेचे आहे. परंतु बावधन परिसरात पुणे मनपा रुग्णालय उपलब्ध नसल्याने प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी दूरच्या ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे बावधन मध्ये लसीकरणाची व्यवस्था करण्याची मागणी  राष्ट्रवादी युवक काँग्रेस खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष कुणाल वेडे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. Kunal Vede Patil’s demand to the District Collector to start a vaccination center in Bawadhan ..

या संदर्भातील निवेदन कुणाल वेडे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी बावधनचे ग्रामपंचायत सदस्य व शिवसेना उपजिल्हा संघटक सचिन दगडे पाटील उपस्थित होते.

Img 20210319 wa0097

लोकप्रतिनिधी स्थानिक लोकांना लसीकरण करण्यासाठी बाहेरच्या ठिकाणी घेऊन जात आहेत, परंतु ते प्रभागात लसीकरण सुविधा चालू करण्यासाठी अकार्यक्षम असल्याचे कुणाल वेडे पाटील यांनी म्हंटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये