राष्ट्रीय

मुस्लिमांच्या कत्तलींवरही चित्रपट बनवा; IAS अधिकाऱ्याचे ट्विट, सरकारने बजावली कारणे दाखवा नोटीस

भोपाळ : काश्मीर फाईल्सच्या निर्मात्यांनी देशातल्या अनेक राज्यांमधल्या मुस्लिमांच्या कत्तलीविषयीही चित्रपट बनवावा, अशा आशयाचं ट्वीट नियाझ खान या प्रशासकीय अधिकाऱ्याने केले आहे. मध्य प्रदेश सरकारने या आयएएस अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. या नोटिसीला उत्तर देण्यासाठी प्रशासकीय अधिकारी नियाझ खान यांना सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. ते राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात उपसचिव पदावर कार्यरत आहेत. 

हे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी खान यांच्यासोबत विचारविमर्श करण्यासाठी त्यांची भेट घेण्याचं ठरवलं आहे.आपल्या ट्वीटमध्ये नियाझ खान म्हणतात, कश्मीर फाईल्समध्ये ब्राह्मणांचं दुःख दाखवलं आहे. त्यांना मानाने आणि सुरक्षितपणे काश्मीरमध्ये राहण्याची परवानगी मिळायला हवी. निर्मात्यांनी देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये होणाऱ्या मुस्लिमांच्या कत्तलीविषयीही चित्रपट बनवायला हवा. मुस्लीम किडे-मुंग्या नाहीत, तीही माणसेच आहेत आणि या देशाचे नागरिक आहेत. आपण मुस्लिमांच्या कत्तलींवर पुस्तक लिहिण्याच्या विचारात आहोत, जेणेकरून जसं द कश्मीर फाईल्स हा चित्रपट तयार झाला, तसंच कोणीतरी या विषयीही चित्रपट तयार करेल, असंही खान यांनी पुढे म्हटलं आहे. त्याचबरोबर खान यांनी निर्मात्यांना चित्रपटाच्या कमाईची रक्कम काश्मिरी पंडितांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तसंच त्यांच्यासाठी काश्मीरमध्ये घरं बांधून देण्यासाठी खर्च करावी, अशी विनंतीही केली आहे. दरम्यान, हे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी खान यांच्यासोबत विचारविमर्श करण्यासाठी त्यांची भेट घेण्याचं ठरवलं आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितलं की खान यांचे ट्वीट्स हा एक गंभीर मुद्दा आहे, त्यामुळेच राज्य सरकारने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये