महाराष्ट्र

एकनाथ शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. त्यानंतर १६४ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. तर ठरावाच्या विरोधात ९९ मतं पडली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सरकारने विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली. 

शरद पवारांचे आभार

“मला आनंद आहे की शरद पवार यांनी देखील संघ, संघाची भूमिका, संघाची शिस्त याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांनी माझा उल्लेख गौरवपूर्ण केला त्याचा मला आनंद आहे. त्यांनी मला संघस्वयंसेवक म्हटलं, मी आहेच. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. राज ठाकरे यांनी अतिशय सुंदर पत्र लिहिलं. खरंतर मी त्याला दुसऱ्या दिवशी उत्तर द्यायचा विचार केला, पण त्यांच्यासारखे शब्द मला सुचले नाहीत. म्हणून मग मी फोन करून त्यांचे आभार मानले. राज ठाकरे यांची अजूनही तब्येत बरी नाही. ते नुकतेच रुग्णालयातून बाहेर आलेत. घरीच आहेत. मी त्यांची भेटही घेणार आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये