पुणे शहर

धोकादायक दांडेकर पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी

पुणे : आंबिल ओढ्या विषयी विविध जाणकारांच्या मदतीने अभ्यासपूर्ण माहिती गोळा करण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत आहे यासाठी आंबिल ओढा वॉक चा दुसरा टप्पा नुकताच पार पडला त्यावेळी एक धक्कादायक गोष्ट निदर्शनास आली ती  म्हणजे दांडेकर पुलाची दुरवस्था झाली आहे. तरी तातडीने धोकादायक दांडेकर पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अ‍ॅड.गणेश सातपुते यांनी केली आहे.(Maharashtra Navnirman Sena demands structural audit of dangerous Dandekar bridge)

सातपुते म्हणाले, आंबिल ओढ्याची माहिती संकलन करताना आम्ही एक व्हिडिओ घेत होतो तेव्हा दांडेकर पुलाची दुरावस्था लक्षात आली. हा पूल पूर्णपणे ढासळण्याच्या अवस्थेत असून पूल हा धोकादायक आहे. यावेळी या भागातील नागरिक देखील उपस्थित होते त्यांनी देखील याविषयी भीती व्यक्त करताना पुलावरून अवजड वाहने गेल्यास आजूबाजूच्या घरांना हादरे बसतात असे सांगितले. या पुलावरील फुटपाथ देखील खचलेले आहे.

Img 20210727 wa0218

दांडेकर पुलाची अवस्था गंभीर असून या पुलाचे पुणे महानगर पालिकेने स्ट्रक्चरल (संरचनात्मक) ऑडिट लवकरात लवकर करून मनपा प्रशासनाने-शासनाने योग्य ती कारवाई करावी.मागील काही घटना पहिल्यास आतापर्यंत चा आपला इतिहास आहे अश्या अपघाती घटना घडल्यावर आपण जागे होतो, मनपा प्रशासनाने लोकांच्या जीवाशी न खेळता यावर योग्य ती कारवाई करावी गरज पडल्यास नवीन पूल बांधावा.आंबिल ओढ्याविषयी अनेक गंभीर निदर्शनास या वॉक च्या दरम्यान निदर्शनास आल्या असून लवकरच त्या प्रशासन आणि जनते समोर ठेवण्यात येतील. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महेश महाले, संतोष पाटील, योगेश खैरे, धोंडीराम सरोदे आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
  


Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये