महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोथरूडतर्फे कोकणातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष व विधी विभागाच्या वतीने चिपळूण जि. रत्नागिरी येथील पूरग्रस्त कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. शेवटच्या गरजू कुटुंबापर्यंत मदत पोहोचवण्याच्या हेतूने चिपळूण मधील गांधीनगर भागामध्ये जाऊन प्रत्यक्ष गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोचविण्यात आली.
सुमारे १२ ते १५ फूट पाणी घरात घुसल्यामुळे तेथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होऊन अतिशय नुकसान झाले होते. आणि हीच गरज लक्षात घेता सुमारे १२६ बाधित कुटुंबीयांना किराणा मालाच्या वस्तू, भांडीकुंडी,कपडे,सतरंज्या, ब्लॅंकेट,औषधे आणि पाणी या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोथरूड मधील तुळजाभवानी देवस्थान ट्रस्ट च्यावतीने महिलांसाठी साड्या पाठविण्यात आल्या होत्या.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस ॲड.किशोर शिंदे यांच्यासह मनसे कोथरूड उपविभाग अध्यक्ष संजय काळे,गणेश शिंदे, श्रीकांत अमराळे,साधू धुमाळ,रोहित मोकाटे, अमित ठोंबरे,आकाश शेलार,प्रज्ञेश जगताप, दयानंद गायकवाड इत्यादी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. संगम तरुण मंडळ,सचिन फ्रेंडस सर्कल,विकास फ्रेंडस सर्कल,वनाझ परिवार, तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मदत कार्य राबविण्यात आले होते.



