पुणे शहर

कोथरूड मध्ये वनाझ परिवार शिव मंदिरामध्ये भक्तिमय वातावरणात संपन्न झाला महाशिवरात्री महोत्सव…

दोन दिवस सुरू आलेल्या महाशिवरात्री महोत्सवात लोटला शिवभक्तांचा महापूर..

कोथरूड :  कोथरूडवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या वनाझ परिवार शिव मंदिरामध्ये गेली दोन दिवस सुरू असलेला महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाशिवरात्रीच्या दिवशी भल्या पहाटे पाच वाजल्यापासून शंभू महादेवाच्या लघुरुद्र अभिषेकाला सुरुवात झाली. आळंदी येथील वारकरी व वनाझ परिवार भजनी मंडळाच्या साथीने सकाळी ९ वाजता पालखीला शिव मंदिरातून सुरुवात करून आझाद नगर गुजरात कॉलनी वनाझ कॉर्नर पौड रोड मार्गे पुन्हा वनाझ परिवारामध्ये अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली.

Img 20250228 wa01764003072394224925638

या मिरवणुकीमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मंदिर आणि परिसरामध्ये केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून घेतले. मंदिर आणि गाभाऱ्यामध्ये देखील सुंदर सजावट करण्यात आली होती. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी ९ वाजता हभप यशवंत महाराज फाले यांचे काल्याचे किर्तन पार पडले तर ११ वाजता महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली.

Img 20240404 wa00142747383113629703933

कोथरूड आणि परिसरातील सुमारे ५००० भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा आस्वाद घेतला.  दिवसेंदिवस वनाझ परिवार शिव मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या वाढतच आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ त्यांच्या पत्नी मोनिका मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, मनसेचे सरचिटणीस ॲड. किशोर शिंदे, कोथरूड पोलीस स्टेशनचे एपीआय बालाजी सानप यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या उत्सवाला आवर्जून उपस्थित होते.

समस्त वनाझ परिवारातील असंख्य महिला भगिनी ,ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांच्या सहकार्याने हा महाशिवरातील उत्सव यशस्वीरित्या पार पडला अशी माहिती वनाझ शिवशंभो सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोथरूड उपविभाग अध्यक्ष संजय काळे यांनी दिली. प्रतिष्ठानचे उत्सव प्रमुख युवराज  गायकवाड, कार्याध्यक्ष दीपक कुल, सचिव विकास जाधव, जनार्दन सातपुते, बाबासाहेब गायकवाड, मिलिंद देशपांडे, यतिन घरत, विशाल उभे, महेश यादव, श्याम सुर्वे, विकास पंदिरे, संतोष बाईत , महेश कांबळे‌ आणि सल्लागार विनायक पवार, केदार घाटे यांच्या प्रयत्नातून महाशिवरात्री उत्सव यशस्वी करण्यात आला.

Img 20240404 wa0013281293529802052601663206

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये