राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या मनीषा विरेश शितोळे बहुमतांनी विजयी होणार – आमदार रोहीत पवार

कर्वेनगर होम कॉलनी प्रभाग क्रमांक 30 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार मनीषा विरेश शितोळे यांच्या प्रचारार्थ रोहीत पवार यांची पदयात्रा
पुणे : मनीषा विरेश शितोळे या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या आहेत. पक्षाच्या सर्व्हे मध्येही त्यांचे नाव आहे. परंतू काही नेत्यांनी अंधारात ठेवून काम केले आहे. त्यामूळे आम्ही त्यांना उमेदवारी दिली आहे. आणि स्थानिक प्रश्नांवर काम करणाऱ्या उच्च शिक्षित उमेदवार म्हणून नागरिकांचा त्यांना पाठिंबा आहे. असे आमदार रोहीत पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पुणे महानगरपालिका निवडणुकीत कर्वेनगर होम कॉलनी प्रभाग क्रमांक 30 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार मनीषा विरेश शितोळे यांच्या प्रचारार्थ रोहीत पवार आले होते.यावेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले,महानगरपालिकेची निवडणूक हि स्थानिक प्रश्नांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. मनीषा शितोळे या स्थानिक विषयांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. निवडून आल्यावर निश्चित पणे त्या नागरिकांच्या विश्वासाला पात्र होतील.
यावेळी आमदार रोहीत पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार मनीषा विरेश शितोळे यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढून पुणे शहराला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी शितोळे यांना बहुमतांनी विजयी करण्याचं आवाहन केलं. या पदयात्रेला मतदारांचा मिळालेला प्रतिसाद पाहता पुणे महापालिकेत निश्चितपणे विजय झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आहे. असेही पवार म्हणाले.



