मराठवाडा मित्रमंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘वर्ल्ड नॉलेज डे सेलिब्रेशन’ उत्साहात

पुणे – मराठवाडा मित्र मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील ग्रंथालय विभागातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती ‘वर्ल्ड नॉलेज डे’ स्वरूपात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. जुबेर सय्यद (फिजिओथेरपी कॉलेज) यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व डॉ. अमोल भणगे (प्रभारी प्राचार्य) यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली.
कार्यक्रमामध्ये ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर करणाऱ्या व जास्तीत जास्त वाचन करणाऱ्या प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये डॉ. योगिनी बोरोले यांचा सन्मान डॉ. जुबेर सय्यद यांनी केला तर प्रा. निसार शेख यांचा सन्मान डॉ. अमोल भणगे यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याविषयी विद्यार्थी प्रणव झाडबुके याने विस्तृत माहिती सादर केली.

कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख डॉ. सुभाष राठोड, डॉ. अतुल खत्री, डॉ. स्वप्नील चौधरी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव गणगे, उपाध्यक्ष प्रा. भाऊसाहेब जाधव, सचिव श्री. किशोर मुंगळे सर व प्राचार्य डॉ. रुपेश भोरटके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ग्रंथपाल रिना कोकणे- गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर रुपाली परळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.