आरोग्य

Mask Must : राज्यात बंदिस्त ठिकाणी मास्कसक्ती

मुंबई : राज्यात बंदिस्त ठिकाणी मास्कसक्ती करण्यात आली असून सार्वजनिक ठिकाणीही मास्क वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य सरकारनं निर्णय घेतला आहे. 

बंदिस्त ठिकाणी पुन्हा मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं असून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी यासंदर्भात पत्रातून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. बस, ट्रेन, ऑडिटोरियम, शाळा, ऑफिस, सिनेमा हॉल्स, कॉलेज, हॉस्पिटलमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे. तसेच, आरोग्य सचिव व्यास यांनी सर्व जिल्हाधिकारी, आयुक्तांना पत्र लिहून कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली लागू करण्याबाबत निर्देश दिले आहेत. यासंदर्भात लिहिलेल्या पत्रात बंदीस्त जागेत जिथं मोठ्या संख्येनं लोक एकत्र येतात, तिथं मास्क घालणं गरजेचं असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

Img 20220518 wa00135092505186750304354 2

आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मात्र माध्यमांशी बोलताना कोरोना मास्क वापरण्याबद्दल ‘मस्ट’ शब्द वापरला असला तरी त्याचा अर्थ ‘बंधनकारक’ असा नाही, असं म्हणत आरोग्य सचिवांच्या आदेशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पालघर, पुणे, ठाणे, रायगड, नागपूर, नाशिक, रत्नागिरी, चंद्रपूर जिल्ह्यांत कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.  

आवर्जून भेट द्यावे असे कर्वेनगर मधील सायकल संग्रहालय
Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये