पुणे शहर

आमदार भिमराव तापकीर यांची मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत पालिका आयुक्तांबरोबर बैठक

पुणे : खडकवासला मतदार संघातील विविध प्रलंबित समस्यांबाबत आमदार भिमराव तापकीर यांच्या नेतृत्वाखाली  शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकित तापकीर यांनी मतदारसंघातील विविध प्रलंबित कामांबाबत आयुक्तांशी चर्चा केली.

यावेळी माजी नगरसेविका अल्पना वरपे यांनी त्यांच्या प्रभागातील प्रलंबित असलेल्या कामाबाबत विविध मुद्दे उपस्थित केले. एकलव्य काॅलेज ते डावी भुसारी काॅलनीला जोडणार्‍या डीपी रोडचे काम पूर्ण करणे, कोथरूड डेपो येथील मुख्य रस्त्यावरील दोन्ही बाजूला फुटपाथ करणे,
बहुउद्देशिय हाॅल, उद्यान,अग्निशामक केंद्र आदी प्रलंबित कामे पूर्ण करणे, महात्मा सोसायटी येथील टेकडीवरील अनाधिकृत बांधकामे,अतिक्रमणांवर कारवाई करणे,
प्रभागात मागील काहि दिवसापासून कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा पूर्ववत करणे असे विविध कामांबाबत वरपे यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केले. यावर तोडगा काढून प्रलंबित विषय मार्गी लावण्याचे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले.

भाजप ओबीसी आघाडीचे सरचिटणीस वासुदेव भोसले यांनी वारजे भागातील प्रश्न या बैठकीत मांडले. वारजे नदीकडे जाताना साचलेला कचरा, वारजे हायवे पासून गणपती माथा या भागतील ट्रॅफिकची समस्या, रस्त्यांची प्रलंबित कामे, यावर यावेळी चर्चा करण्यात आली.

कोंढवे, कोपरे, शिवणे, उत्तमनगर या चार गावातील पाणी प्रश्न या बैठकीत उपस्थित करण्यात आला. यावेळी उपायुक्त राजेंद्र जी बिनवडे, व्ही.जी कुलकर्णी, अनिरुद्ध पावसकर तसेच सचिन मोरे, हरिदास चरवड, अल्पना वरपे, वर्षा तापकीर, राणी भोसले, सुभाष नानेकर, सचिन दांगट, भगवानराव गायकवाड, अभिषेक धावडे, रमेश धावडे, निखिल धावडे, सुनील हागवणे, रुपेश घुले, मयूर तातुस्कर, व मतदार संघातील पदाधिकारी उपस्थित होते..

काय आहेत पान खाण्याचे फायदे व तोटे.
Fb img 1648963058213
Img 20220409 wa00076833851649454856397

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये