पुणे शहर

पुण्यातील कर्वेनगरमध्ये अचानक 15 ते 20 फूट जमीन खचली; गिरिजाशंकर सोसायटीमधील प्रकार,परिसरात खळबळ

पुणे: पुण्यातील वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयजवळ असलेल्या गिरिजाशंकर सोसायटीमध्ये अचानक जमीन खचल्याने 15 ते 20 फूट खड्डा पडला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर मोठी गर्दी झाल्याने पोलिसांकडून तात्पुरत्या स्वरूपात रस्ता बंद करण्यात आला आहे.

कर्वेनगर भागातील गिरिजा शंकर सोसायटीमध्ये सायंकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अचानकपणे जमीन खचल्याने मोठी खळबळ माजली आहे. गिरिजा शंकर सोसायटीमधील एका इमारतीच्या पार्किंगच्या कॉलमला लागून 15 ते 20 फूट जमीन खचल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत या जवळच एक जुनी विहीर आहे.मात्र अचानक पणे अशा प्रकारे जमीन कशी काय खचली? याचा तपास सुरु आहे.

याबाबतीत बोलताना भाजपाचे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर म्हणाले, मी आत्ता घटनास्थळी आहे अधिकारी काही वेळातच या स्थळी पोहोचतील त्यांनी माहिती घेतल्यानंतर आणि तपास केल्यानंतर नेमका प्रकार काय आहे हे लक्षात येणार आहे.

Img 20230511 wa00027384472977045778543
Img 20220425 wa0010282295345156635031542582

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये