बावधन कोकाटे वस्तीतील गाजलेल्या प्रकरणावर कारवाई करण्याची आमदार भीमराव तापकीर यांची विधानसभेत मागणी..

पोलीस व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा.. तापकीर
पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी आज विधान मंडळात औचित्याचा मुद्दा उपस्थित करत बावधन कोकाटे वस्ती येथे दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या ध्वनी प्रदूषण, वृक्षतोड आणि कायद्याच्या सर्रास उल्लंघनाचा तीव्र निषेध केला व सरकारला तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तापकीर यांनी या प्रकरणाचे खालीलप्रमाणे मुद्दे मांडले :
1. ध्वनी प्रदूषणाचा कहर: रात्री 10 वाजल्यानंतर बंदी असतानाही पहाटे 3.30 वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू, नागरिकांचा मानसिक व शारीरिक त्रास.
2. पोलिस प्रशासन निष्क्रिय: तक्रारी करूनही तत्काळ कारवाई नाही; साउंड सिस्टम जप्तीवर टाळाटाळ.
3. वृक्षतोड व पर्यावरणाचा र्हास: बीडीपी आरक्षित जमिनीवर वृक्षतोड, सपाटीकरण आणि उत्खनन; वन्यजीवांना धोका.
4. नागरिकांच्या हक्कांची पायमल्ली: कायद्याचे उल्लंघन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा भंग.

आमदार तापकीर यांनी याप्रकरणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस व संबंधीत अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत आयोजकांवर ध्वनी प्रदूषण व वृक्षतोडीबाबत देखील कठोर कारवाई ची मागणी केली.
भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी “कायद्याचे उल्लंघन आणि पर्यावरणाचा नाश कदापि सहन केला जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी ठाम भूमिका आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेत मांडली.









