महाराष्ट्र

भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं   निधन..

राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. कर्डिले यांना पहाटेच्या सुमारास त्रास होऊ लागल्याने त्यांना साईदीप रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे घोषित केले.

कर्डिले यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ह्रदयविकाराच्या धक्क्याने कर्डीले यांचे निधन झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ते अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. त्यांनी सहावेळा आमदारकी भूषवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत.

Img 20251003 wa0253645896197351427070

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये