कोथरूड मनसे महिला अध्यक्षपदी यामिनी मठकरी यांची निवड

पुणे : यामिनी मठकरी यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोथरूड शाखाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नियुक्तीचे पत्र पुणे शहराध्यक्ष वनिता वागस्कर यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्षा सुशीला नेटके व इतर पदाधिकारी आणि मनसैनिकांच्या उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी मनसे नेते राजेंद्र वागस्कर,महाराष्ट्र राज्य सरचिटणीस किशोरजी शिंदे ,महिला विभाग अध्यक्षा सुरेखा होले,उपविभाग अध्यक्ष संजय काळे ,उपविभाग अध्यक्षा सुप्रिया काळे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी लढणारे ,मराठी भाषा टिकवून ठेवण्यासाठी सतत तळमळ करणारे,जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवण्याचा विचार करणारे आणि फक्त विचारच नाही तर महाराष्ट्रासाठी विकास आराखड्याची संकल्पना ( ब्ल्यू प्रिंट) द्वारे सादर करणारे आणि महाराष्ट्राच नवनिर्माण करण्याच ध्येय डोळ्यासमोर ठेवून सतत त्यासाठी कार्यरत असणारे एकमेव नेते आहेत.असा महाराष्ट्र नवनिर्माण करण्याच्या संकल्पनेत माझाही खारीचा वाटा असावा यासाठी मी सतत कार्यरत असेल. अशी प्रतिक्रिया निवडीनंतर यामिनी मठकरी यांनी दिली.













