शास्त्रीय संगीत चिरकाल टिकणारे- देवेंद्र फडणवीस ; कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन

पुणे : शास्त्रीय संगीत मूलभूत आहे. त्याला फार
ग्लॅमर नसले, तरी ते चिरकाल टिकणारे आहे. शास्त्रीय संगीताची उपासना आपण सुरू ठेवली.हि आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.हा आपला व शास्त्रीय संगीताचा सत्कार आहे,” असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंडित शौनक अभिषेकी यांना पुरस्कार प्रदान करताना केले.
पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १२ व्या कोथरुड सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यंदाचा संस्कृती कलागौरव पुरस्कार २०२२ शौनक अभिषेकी यांना प्रदान करण्यात आला. तसेच यंदाचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याचा बजरंगबलीची मुर्ती,सन्मानचिन्ह व रोख रक्कम ५१ हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला.

फडणवीस म्हणाले, कोथरूड सांस्कृतिक महोत्सव हा पुणे शहराचा सांस्कृतिक महोत्सव आहे. गेल्या दोन वर्षांत कोविड मुळे महोत्सव साजरा झाला नाही. मात्र यंदा सर्व निर्बंध हटल्याने सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील नागरिकांची सांस्कृतिक भूक भागविण्याचे काम कोथरूड महोत्सव करीत आहे. महापौर मुरलीधर मोहोळ आणि लोकप्रतिनिधींनी कोविड काळात मोठे काम केले आहे. आणि नागरीकांना सुविधा उपलब्ध करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.



यावेळी मिलिंद रथकंठीवार यांनी संपादन केलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्या कारकिर्दीवरील पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील,
अभिनेता स्वप्नील जोशी, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, मोनिका मोहोळ, योगेश टिळेकर, गायक संगीतकार डॉ. सलील
कुलकर्णी, लेखक अभिनेते डॉ. नीलेश साबळे, प्रविण बढेकर उपस्थित होते.



पंडित शौनक अभिषेकी म्हणाले, कोथरुड, कर्वेनगरवासीयांनी खूप प्रेम दिले आहे व महापौर मुरलीधर मोहोळे यांनी कोविड काळात एवढे मोठे काम केले आहे. हा घरचा पुरस्कार स्वीकारताना खूप आनंद होत आहे. मी केवळ शास्त्रीय संगीताचा साधक आहे. मला जे संगीताचा प्रचार, प्रसाराचे काम करायचे आहे, त्यासाठी हे पुरस्कार प्रोत्साहन देतात.
मुरलीधर मोहोळ प्रास्ताविकात म्हणाले, “या संधी या माध्यमातून मिळाली.महोत्सवाला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद महोत्सवाच्या पहिल्या आनंद देणारा आहे. ज्येष्ठ कलाकाराचा, दिवसाचा उत्तरार्ध ‘चला हवा येऊ कुस्तीपटूचा गौरव देवेंद्र फडणवीस द्या’ हा कार्यक्रम रंगला. योगेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.



