पुणे शहर

मेट्रोच्या कामांमुळे रस्त्यावर खड्डे  पडल्याने अपघाताचा धोका ; पृथ्वीराज सुतार यांनी महामेट्रोला दिला आंदोलनाचा इशारा..

पुणे : पुणे शहरामध्ये कोथरुड मधील वनाझ ते नगर रस्त्यावरील रामवाडी व पिंपरी ते स्वारगेट अशा दोन मेट्रो मार्गाचे काम महामेट्रो मार्फत सुरु आहे. मात्र ज्या रस्त्यांवर ही कामे सुरू आहेत त्या रस्त्यांवर या कामांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे या समस्यांचे निराकरण करून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी पुणे महानगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते, नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे. The risk of an accident due to potholes on the road due to metro work;  Prithviraj Sutar warns Mahametro of agitation ..

या संदर्भातील निवेदन सुतार यांच्याकडून महामेट्रो चे संचालक अतुल गाडगीळ यांना देण्यात आले आहे.
सदरचे मेट्रोचे काम काम गेल्या चार ते पाच वर्षांपासून सुरु आहे. मेट्रोचे काम होणे आवश्यक आहे पण  हे काम करत असताना रस्त्यावरील वाहनचालकांना , नागरिकांना काही त्रास होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक होते, मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ज्या मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे त्या मार्गावरील रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठे खड्डे मेट्रोच्या कामामुळे पडले आहेत, तसेच स्ट्रीट लाईटचे पोल संपूर्णपणे काढले असल्यामुळे या रस्त्यांवरील  स्ट्रीट लाईट पूर्ण बंद आहेत. त्यामुळे रस्त्यावर साठलेले पाणी व खड्डे याचा आंदाज येत नसल्याने अपघात घडत आहे. या कारणामुळे रस्ते अपघातात जीवित हानी झाल्यास त्याला महामेट्रो जबाबदार राहणार का असा प्रश्न पृथ्वीराज सुतार यांनी उपस्थित केला आहे.

मेट्रोचे काम करत असताना त्या खालील रस्त्यांचीही देखभाल दुरुस्ती व्यवस्थित होणे आवश्यक होते मात्र तसे न झाल्याने या रस्त्यावरून वाहने चालवताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे रस्त्यावर साठत असलेले पावसाचे पाणी, त्यात असलेले खड्डे, स्ट्रीट लाईट नसल्याने रात्रीच्या वेळेचा अंधार यामुळे वाहने कशी चालवावी असा प्रश्न वाहनचालकांना पडलेला असतो. महामेट्रोचे काम सुरू असलेल्या रस्त्यांवर अपघातात कोणी दगावल्यास त्याला महामेट्रो व मनपा प्रशासनाला जबाबदार धरण्यात येईल तसेच “आठ” दिवसांमध्ये रस्त्यांवरचे संपूर्ण खड्डे बुजविण्याचे काम व स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम झाले नाही तर “शिवसेना पक्षामार्फत महामेट्रो कार्यालय व आयुक्त कार्यालय येथे खड्डे भरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पृथ्वीराज सुतार यांनी दिला आहे.

Img 20210727 wa0218

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये