पुणे शहर

वारजेत पुणे महापालिका कर्ज काढून उभारणार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

पुणे : वारजे येथे ३५० बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार असून, त्यासाठी पुणे महापालिका खासगी कंपनीला ३६० कोटी रुपयांचे कर्ज काढून देणार आहे. त्याबदल्यात पुणेकरांसाठी या रुग्णालयात १० टक्के मोफत बेड, ६ टक्के बेड्स हे केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या (सीजीएचएस) दरामध्ये उपलब्ध होणार आहेत. तर ८४ टक्के बेड्स संबंधित कंपनीला व्यावसायिक दराने वापरता येणार आहेत. या प्रस्तावास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

गतवर्षी महापालिकेची मुदत संपण्याच्या पूर्वी फेब्रुवारी २०२२ मध्ये भाजपने वारजे येथे डिझाइन- बिल्ट-फायनान्स-ऑपरेट-ट्रान्स्फर (डीबीएफओटी) या तत्त्वावर रुग्णालय उभारण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली होती. त्यानंतर हा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. शासनाने कर्ज उभारणी मान्यता दिली, त्यानंतर याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पहिल्यांदा या या निविदेत एकाच कंपनीने भाग घेतल्याने पुन्हा निविदेस मुदतवाढ दिली. त्यामध्ये रुरल एनहांसर्स आणि मे.ए.सी.शेख कॉन्ट्रॅक्टर या दोनच कंपन्या सहभागी झाल्या. यामध्ये रुरल एनहांसर्स या कंपनीचा प्रस्ताव महापालिकेच्या फायद्याचा असल्याने त्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पुढील ४५ दिवसात या कंपनीने लेटर ऑफ इंटेट सादर केल्यानंतर कार्यआदेश दिले जाणार आहेत.

Img 20221126 wa02126927299965323449855

वारजे येथे सर्वे क्रमांक ७९/ब या येथे १० हजार चौरस फुटाची जागा रुग्णालयासाठी उपलब्ध आहे. महापालिका नेदरलँडच्या बँकेकडून ३६० कोटीचे कर्ज घेणार आहे. रुग्णालय उभारल्यानंतर कर्जाचे हस्ते संबंधित संस्था फेडणार आहे. १० टक्के फ्री बेड तर ६ टक्के बेड्स हे सीजीएचएस दरामध्ये उपलब्ध होतील. आजी-माजी नगरसेवकांना सीजीएचएस सुविधा असणार आहे. ८४ टक्के बेड्सवर ही कंपनी व्यावसायीक दराने उपचार करणार आहे. ही कंपनी महापालिकेला दरवर्षी ९० लाख रुपये भाडे देणार आहे. ३० वर्षासाठीच्या करारात दरवर्षी ३ टक्के भाडेवाढ होणार आहे.

नेदरलँडमधील इन्शुरन्स कंपनी या कर्जाचा विमा उतरवणार आहे. कर्जाचे हप्ते संबंधित संस्थेने भरायचे आहेत. यासाठी महापालिका, निविदाधारक आणि कर्ज पुरवठा करणारी बँक यांच्यात त्रिसदस्यीय करार केला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये