पुणे शहर

कर्वेनगरमधील मोरया मित्र मंडळ संस्कृती जोपासणारे मंडळ : नगरसेवक स्वप्नील दुधाने

मोरया मित्र मंडळात गणेश जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

कर्वेनगर : कर्वेनगर मधील मोरया मित्र मंडळामध्ये गणेश जन्म सोहळा उत्साहात संपन्न झाला. होम हवन, महाआरती, महाप्रसाद, अशी विधिवत पूजा करत मंडळाच्या वतीने सर्वांना गणेश जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. 

यावेळी मंडळाचे जेष्ठ नागरिक निजाप्पा वाघमारे, सुभाष भवर, शिवाजी बोरकर, महादेव शिनगारे यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगरसेवक स्वप्नील दुधाने यांचा पुस्तक, शाल श्रीफळ देऊन नागरी सत्कार करण्यात आला. स्वप्नील दुधाने म्हणाले, मोरया मित्र मंडळ हे संस्कृती जोपासणारे मंडळ असून ते सामाजिक भान जपत सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असते, त्यामुळे कायमच मंडळाच्या कामाचे कौतुक वाटते.

Img 20251125 wa01782121520512185783132

” हळदकुंकू हा समारंभ प्रेम, आनंद व सकारात्मकतेचा संदेश देतो. तिळगुळाच्या गोडव्याप्रमाणे आपल्या भागातील नागरीकांचे नातेही गोड राहो, आपापसातील प्रेम आणि सलोखा वाढत राहण्यासाठी, सुखी आणि समृद्ध आयुष्यासाठी सर्व एकत्र येऊन नवीन वर्षाची सुरुवात नवचैतन्यात करावी म्हणून ह्या हळद कुंकू समारंभाचे दरवर्षी मोरया मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येते असे प्रतिपादन कार्यक्रमाचे आयोजक मोरया मित्र मंडळ संस्थापक केदार वसंत मारणे यांनी यावेळी केले.

यावेळी माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, विजय खळदकर, संगिता बराटे, निवेदिता जोशी,शैलेश जोशी,समिता थोरवे मंडळाच्या कमल गायकवाड, स्वाती दारवटकर, संगिता भरम, रेणुका जावळे, सुरेखा जोशी, वर्षा शिगवन, मनिषा जावळे , ललिता नवघणे, अंजली साकळे, उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये