पुणे शहर

पुणे शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने तातडीने सीसीसी सेंटर सुरू करावेत : पृथ्वीराज सुतार

पुणे : pune city – पुणे शहरामध्ये कोरोनाच्या संकटाने मोठे थैमान मांडले आहे. रोज साधारण पाच हजार ते सहा हजार पॉझिटिव्ह रूग्ण शहरात सापडत आहेत. मात्र वारंवार मागणी करूनही महापालिका प्रशासन शहराच्या विविध भागात सीसीसी सेंटर (कोविड केअर सेंटर) सुरू करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महानगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केला आहे. शहरात वाढत चाललेला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध ठिकाणी तातडीने सीसीसी सेंटर सुरू करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. municipal-administration-should-immediately-start-ccc-center-to-prevent-the-spread-of-corona-in-pune-city

सुतार यांनी म्हंटले आहे की, सीसीसी सेंटर त्वरीत सुरू करावेत, ऑक्सिजन बेड्स व व्हेंटीलेटर बेड्सची संख्या वाढवावी याबाबत व रूग्णांच्या गैरसोईबद्दल आम्ही साधारण एक महिन्यापूर्वी सुध्दा आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती, परंतु मागाच्या वर्षी प्रमाणे सर्व ठिकाणी सीसीसी सेंटर अद्यापही सुरू झाले नाहीत. बेडस् मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी पडत आहेत, योग्य त्या सुविधा वेळेमध्ये मिळत नसल्यामुळे पॉझिटिव्ह रूग्ण वाढत आहेत तसेच मृत्युची संख्या सुध्दा वाढत चालली आहे.

Img 20210223 wa0156

कोरोना ने शहरात थैमान घातले असताना, अजूनही प्रशासन गंभीर नाही का? अजून किती पुणेकरांच्या जिवाशी आपण खेळणार आहात ? असा सवाल सुतार यांनी उपस्थित केला आहे. मागच्या वर्षी सर्वत्र सीसीसी सेंटर सुरू होते. सूक्ष्म लक्षणे असलेले रुग्ण लगेच त्याठिकाणी क्वारंटाईन होत होते व त्यामुळे कोरोना चा प्रसार रोखला जात होता. मात्र आता एवढ्या झपाट्याने रुग्ण वाढत असतानाही पालिका प्रशासनाला जाग येत नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

प्रशासनाने आपल्या कामाचा प्राधान्य क्रम निश्चित करून सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन प्रत्येक
अधिकाऱ्याला जबाबदारी देऊन कामांचे वाटप करावे. तसेच आपण जे बेडस् मागणीसाठी हेल्पलाईन नंबर
दिले आहेत त्या हेल्पलाईनची व्यवस्था कुचकामी ठरली असून त्या व्यवस्थेचा फायदा कमी व नुकसानच जास्त होत आहे. आपण बेड्स च्या  मागणी बाबत त्या त्या सरकारी हॉस्पिटलची स्वतंत्र हेल्पलाईनची व्यवस्था  करावी. ज्यामुळे खरी व योग्य ती माहिती बेडबाबत मिळण्यास मदत होईल. तसेच रेमडिसिविर इंजेक्शनची खरेदी मनपाने तातडीने करून,पुणेकरांना मोफत ती इंजेक्शन उपलब्ध करून दयावेत. अशी मागणी पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये