पुणे शहर

मुरलीधर मोहोळ यांना पुणे लोकसभा निवडणुक प्रमुखपदाची जबाबदारी

पुणे : पुणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रमुखपदी मुरलीधर मोहोळ, शिरूर लोकसभा मतदार संघासाठी महेश लांडगे आणि बारामती लोकसभा मतदार संघासाठी राहुल कुल यांची नियुक्ती भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.

आगामी लोकसभांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या लोकसभेच्या मतदार संघांवर आपले तरुण नेतृत्व निवडणूक प्रमुख पदावर नियुक्त केले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नियुक्त्या केल्या असून मतदार संघांमध्ये लोकप्रियता असलेले तसेच सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणारे नेते भाजपाने लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रमुख पदी नियुक्त करून लोकसभा निवडणुका पूर्ण ताकतीने जिंकण्याचा निश्चय केल्याचे दिसत आहे.

माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सध्या भाजपाच्या राज्य सरचिटणीस पदाची जबाबदारी असून पुणे शहरांमध्ये कोरोना कालावधीमध्ये केलेल्या कामामुळे ते सर्व सामान्य नागरिकांना मध्ये लोकप्रिय ठरले होते. याचा फायदा भाजपाला पुणे शहरांमध्ये राजकीय बांधणी करण्यासाठी होणार आहे. तर आमदार महेश लांडगे हे पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष म्हणून काम करत आहेत.

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682
Fb img 16837376233493064729888638918603

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये