आरोग्य

फिजिओथेरपी शिबिरात 100 हून अधिक रुग्णांची तपासणी

नाशिक : “निरोगी आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली
“जिथे कमी तेथे आम्ही “ या उक्तीवर चालणाऱ्या नमस्ते नाशिक फाउंडेशन, नाशिक यांच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्तानेनमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक व गोखले एज्युकेशन सोसायटीचे सर डॉ. मो. स. गोसावी भौतिकोपचार महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत फिजिओथेरपी तपासणी व त्यावरील उपचाराचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 100 हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली

बरेचसे आजार असे आहेत जे औषधाविना व शस्त्रक्रिया न करता व्यायामाद्वारे सुद्धा बरे होऊ शकतात यासाठी फिजिओथेरपी ही सोपी व आधुनिक उपचार पद्धती खूप फायदेशीर ठरते. शिबिरात 100 हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्यांना फिजिओथेरपी विषयी मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. राकेश जाधव ( प्रिन्सिपल इन्चार्ज), डॉ. अर्चना बोधले, ( असोसिएट प्रोफेसर), डॉ. श्रद्धा कोठावळे, डॉ. प्रियंका अहिरे (असिस्टंट प्रोफेसर) यांनी रुग्णांची तपासणी केली व त्यावर मार्गदर्शन केले.


शिबिरास अजय बोरस्ते , साहेबराव पाटील ,एड. उज्वला पाटील, महावीर इंटरनॅशनलचे अनिल नाहर ,राजेंद्र डुंगरवाल , अनिल बाफना , लाफ्टर योगाचे संजय सोनार , राजेंद्र पवार, विजय शिरसाठ, रोहित पारख अर्थकला फायनान्शियलचे संदीप महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम पार पडण्यासाठी राजेंद्र गुप्ते, नमस्ते नाशिक फाउंडेशनचे खजिनदार संदिप देव यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये