पुणे शहर

राष्ट्रवादीचे नेते दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे गिरीश गुरनानी आणि सनी मानकर यांच्या कडून नोकरी महोत्सवाचे 6 मे रोजी आयोजन

पुणे : राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे पुणे शहराचे नेते व माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे गिरीश गुरनानी आणि सनी मानकर यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे गिरीश गुरनानी आणि सनी मानकर यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे.

गिरीश गुरनानी आणि सनी मानकर म्हणाले, दीपक भाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही दिनांक 6 मे 2023 सकाळी 9.00 वा, उत्सव मंगल कार्यालय, कोथरूड, पुणे. येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना रोजगाराची हमखास संधी मिळणार आहे.

Img 20230503 wa00066055551718246966984

या नोकरी महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवकांनी ऑनलाईन फॉर्म भरून आपली नाव नोंदणी करावी. अथवा तुम्ही रोजगार मेळाव्याच्या दिवशी मेळाव्याच्या ठिकाणीही नोंदणी करू शकता. अशी माहिती गुरनानी व मानकर यांनी दिली आहे.

Img 20230503 wa00128836785746506742437

अर्जाचे_संकेत_स्थळ :
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी दिलेल्या QR Code चा वापर करावा अथवा दिलेल्या लिंकचा वापर करावा.
https://shorturl.at/mHRW9
अथवा तुम्ही रोजगार मेळाव्याच्या दिवशी मेळाव्याच्या ठिकाणीही नोंदणी करू शकता.अधिक माहितीसाठी संपर्क:-7387281150 (केतन), 9579032641(सचिन) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन गुरनानी व मानकर यांनी केले आहे.

Img 20220425 wa0010282295230586519690125679

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये