पुणे शहर

पुण्यात ९० ऑक्सिजन आणि १० व्हेंटिलेटर बेड्स नव्याने उपलब्ध

पुणे : पुण्यातील बिबवेवाडी येथे असणाऱ्या इएसआयसी अर्थात एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन रुग्णालय आपण पुणे महापालिकेच्या वतीने कार्यान्वित केले आहे. या हॉस्पिटलमध्ये १०० बेड्स उपलब्ध केल्या आहेत. यात ९० ऑक्सिजन बेड्स आणि १० व्हेंटिलेटर बेड्सचा समावेश आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी रुग्णालयाच्या अंतिम तयारीचा आढावा घेतला. यावेळी आमदार माधुरी मिसाळ आणि आयुक्त विक्रम कुमार हेही उपस्थित होते.Newly available oxygen and 10 ventilator beds in Pune    

Img 20210413 wa0011

मोहोळ म्हणाले,या रुग्णालयात आधीपासूनच उपलब्ध सुविधेबरोबरच आवश्यक सुविधांची पूर्तता आपल्या पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. यात विविध कामे करण्यात आली तर आहेच शिवाय डॉक्टरही उपलब्ध  करुन देत आहोत. तसेच या ठिकाणी आपल्याला २० एमबीबीएस डॉक्टर्स उपलब्ध झाले आहेत. केंद्रावर पुणे महापालिकेच्या वतीने एका नोडल अधिकाऱ्याचीही नेमणूक करण्यात आली आहे. महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे सुसज्ज आणि अत्यंत उत्तम पद्धतीचं एक तयार हॉस्पिटल सेवेत उपलब्ध झाले आहे.

Img 20210413 wa0010

वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता पुणे शहरात विविध माध्यमातून नव्याने बेड्स उपलब्ध करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याला काही प्रमाणात यशही येत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे हे हॉस्पिटल !

Img 20210413 wa0009
Img 20210413 wa0015
Img 20210412 wa0056

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये