नळ स्टॉप चौकातील नाईट लाईफला दणका ; महापालिकेची कारवाई.. पण कारवाईत सातत्य हवे

उशीरा सुरू राहणाऱ्या शॉप्स वर कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांची ; महापालिका
सिंहासन news बातमी इम्पॅक्ट
पुणे : कोथरूड मधील नळस्टॉप चौकात रात्री ११, १२ नंतर सुरू होत असलेल्या स्टॉल व दुकानांमुळे नाईट लाईफ चे वातावरण निर्माण झाले होते. रात्री १२ वाजल्यानंतर पहाटे पर्यंत तरुण तरुणींचे घोळके या ठिकाणी पहिला मिळत होते. हा प्रकार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे. या प्रकाराकडे पोलीस व पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष का ? या आशयाची बातमी सिंहासन News ने प्रसिद्ध केल्यानंतर महापालिकेच्या वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने शनिवारी रात्री धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत अनेक स्टॉल जप्त करण्यात आले आहेत.
महापालिकेच्या वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी रात्री उशीरा कारवाई करण्यात आली आहे. या चौकात लागणाऱ्या स्टॉल बरोबरच इतर ठिकाणी ही रात्री उशीरा लागणारे स्टॉल या कारवाईत जप्त करण्यात आले आहेत. स्टॉल जप्त केले असेल तरी नळ स्टॉप चौकात रात्री १२ नंतर सुरू होऊन सकाळ पर्यंत सुरू राहणाऱ्या शॉप्सचे काय ? त्यामुळे हा प्रकार सुरू राहणार असून दुर्लक्ष न करता त्यांच्यावरही कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे.
नळ स्टॉप चौकातील नाईट लाईफचा विषय सध्या चर्चेत आहे. रात्री ११,१२ वाजल्यानंतर या चौकात नाईट लाईफ सुरू होऊन ती पहाटे पर्यंत सुरू राहते. रात्री उशीरा या चौकातील दुकाने खुली होतात, रस्त्यावर पदपथावर, पुलाखाली मोठ्या संख्येने स्टॉल लागतात. मग या स्टॉल व दुकानाभोवती तरुण तरुणींची होणारी गर्दी, सिगारेटचा धूर हवेत सोडत पोटाची भागवली जाणारी भूक, सिगारेट बरोबर इतर व्यसनांना इथे मिळणारी जोड, मद्यधुंद अवस्थेतील तरुण तरुणींकडून उशीरपर्यंत घातला जाणारा गोंधळ, उशीर पर्यंत खायला मिळत असल्याने चौकातच सुरू झालेले तळीरामांचे अड्डे, पोलिसांचे होणारे दुर्लक्ष अशा विविध मुद्यांकडे सिंहासन न्यूज ने दिलेल्या बातमीत लक्ष वेधण्यात आले होते.
महापालिका सहाय्यक आयुक्त राजेश गुर्रम म्हणाले, आम्ही रात्री १२ नंतर या चौकात कारवाई करून सहा स्टॉल व टेबल लावून सुरू केलेले स्नॅक्स सेंटरचे सामान ताब्यात घेतले आहे. पुन्हा असा प्रकार होऊ नये यासाठी प्रयत्न राहणार असून सातत्याने पाहणी करून कारवाई सत्र चालू ठेवणार आहे. चौकात रात्री चालू राहत असलेले शॉप बद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले रात्री उशिरा चालू राहणारे शॉप्स हा विषय पोलिसांच्या अखत्यारीतील असून त्याबाबत त्यांनी निर्णय घेणे आवश्यक आहे. आम्ही रस्त्यावर फुटपाथवरील स्टॉलवर कारवाई केली आहे.
मनसेचे पदाधिकारी मंदार बलकवडे म्हणाले, सिंहासन news च्या बातमीनंतर प्रशासन जागे झाले असून रात्री लागणाऱ्या स्टॉलवर कारवाई झाली ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे येथील अनुचित प्रकार थांबण्यास मदत होईल, मात्र अजून चौकात काही ठिकाणी स्टॉल लागत असून हा प्रकार थांबवण्यासाठी कारवाईत सातत्य ठेवणे आवश्यक आहे. स्टॉल वर कारवाई होत असली तरी येथील शॉप रात्रीच्या वेळी चालू राहत असून त्याबाबतही योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.

अलांकरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी आम्ही वेळोवेळी केसेस दाखल करून कोर्टात दंड भरून घेत असल्याची प्रतिक्रिया पहिल्या बातमीत दिली होती. अशी कारवाई होत असली तरी येथील प्रकार कमी झाला नसल्याने या स्टॉल धारकांना व दुकानदारांना पोलिस कारवाईची भीती का वाटत नाही, या मागचे कारण काय असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. या चौकातील स्टॉलवर पालिका कारवाई करत आहे तशीच कारवाई या चौकात रात्रभर सुरू राहणाऱ्या दुकानांवर पोलीस करणार का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
पुण्यातील कर्वे रस्त्यावरील नळ स्टॉप चौकात नाईट लाईफ जोमात ; कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे प्रकार ? https://www.sinhasannews.com/nightlife-in-punes-karve-road-is-in-full-swing-deliberate-neglect-by-the-police-17763/


