शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवर भाजपची प्रतिक्रिया म्हणाले, उद्धव ठाकरेंसाठी…

मुंबई : शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडसोबत युतीची घोषणा केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यावर टीका केली आहे. संभाजी ब्रिगेडसोबत जाऊन काही होणार नाही. हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत वाईट आहे, अशा शब्दांत बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संभाजी ब्रिगेडने २०१९ मध्ये ४० जागांवर निवडणूक लढवली. त्यांना ०.०६ टक्के मतं मिळाली. उद्धव ठाकरेंना इतकी कमी मतं मिळवणाऱ्या पार्टनरसोबत युती करावी लागतेय. महाराष्ट्रातील कोणताही पक्ष त्यांच्याशी युती करायला तयार नाही. त्यांच्यासोबतचे मित्र त्यांना सोडून पळून जातील. संभाजी ब्रिगेडसोबत जाऊन काही होणार नाही. ते महाराष्ट्राला आव आणून सांगत आहेत. पण हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत वाईट आहे, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
आम्हाला काहीही फरक पडत नाही. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, असे बॅट्समन आहेत की जेव्हा क्रिकेटचा खेळ सुरू होईल, एवढे चौकार आणि षटकार लागणार आहेत की महाविकास आघाडी, संभाजी ब्रिगेड असे सगळे गारद होतील, असं बावनकुळे म्हणाले.



