पुणे शहर

चांदणी चौक वाहतूक कोंडी; मुख्यमंत्र्यांना थांबवत कोथरूडकरांनी केली तक्रार

पुणे : चांदणी चौकात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाल्याने वैतागलेल्या कोथरूडकरांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाहनांचा ताफा अडवत थेट त्यांच्याकडे याची तक्रार केली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या उड्डाणपूल कामामुळे हे कोंडी होत असल्याचे सांगितले जाते. शुक्रवारी रात्री 8 वाजता मुख्यमंत्री शिंदे हे सातारा येथे निघाले असताना चांदणी चौकाजवळ त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. राज्याच्या मुख्य सचिवांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देऊन तत्काळ उपाययोजना करण्यास सांगितले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक प्रवाश्यांच्या समस्या ऐकून घेत तात्काळ चांदणी चौक वाहतूक कोंडी संदर्भात पुणे महापालिका आयुक्त, पिपंरी चिंचवड पोलिस आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, नॅशनल हायवे प्राधिकरण आणि राज्याचे मुख्य सचिव यांना फोन करून प्रवाश्यांची समस्या दूर करण्यास सांगितले. मुख्यमंत्र्यांनी नागरिकांचा संताप पाहून संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरुन संपर्क केला आणि सकाळी साडेअकरा वाजता येथील वाहतूक कोंडीचा आढावा घेण्यास आणि पाहणी सांगितले आहे. पाहणी करून झाल्यावर प्रवाश्यांची समस्या कशी सोडवणार याचा अहवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांची दखल घेत अधिकाऱ्यांना कामाला लावले असले तरी पुणेकरांना खरेच या कोंडीतून सुटका मिळणार का, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. सकाळी साडेअकरा वाजता चांदणी चौकात संबंधित सर्व आस्थापनांचे वरिष्ठ अधिकारी येऊन पाहाणी करणार आहेत. पाहाणी करून झाल्यावर प्रवाश्यांची समस्या कशी सोडवणार याचा अहवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला जाणार आहे.

चांदणी चौक येथे मागील काही महिन्यापासून होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरीक त्रस्त आहेत. याबाबत नागरिकांनी वारंवार प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यासह विविध स्तरावर प्रश्न मांडला. तरीही हा प्रश्न सुटण्यास अद्याप तयार नाही. त्यामुळे अखेर नागरिकांचा ही अखेर संयम सुटला आहे.

मुख्यमंत्री शिंदे हे शुक्रवारी रात्री साताऱ्यातील सातोला या ठिकाणी जात होते. त्यांचा ताफा रात्री आठ वाजता चांदणी चौकाजवळ सुस खिंड येथे आला. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी नागरिकांची वाहने थांबवून मुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्याला वाट करून देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे या मार्गाने जात असल्याने काही संघटना व नागरिकांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी त्यांना थांबण्याची विनंती केली. त्यानुसार शिंदे यांनी तेथे थांबून काही वेळ नागरिकांशी संवाद साधला. तेव्हा, तेथील नागरिकांनी चांदणी चौक येथील उड्डाणपूल कामामुळे होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या मांडली. त्यांनी संदर्भात स्थानिक नागरिकांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. शिंदे यांनी तात्काळ संबंधीत सर्व अस्थापनांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांदणी चौकातील फ्लायओव्हरपाशी होणाऱ्या वाहतूक कोंडीची पाहाणी करून प्रवाश्यांची समस्या सोडवण्याचे आदेश दिले आहेत.

Fb img 1647413711531

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये