पुणे शहर

कोथरूडमध्ये आता फिरते पुस्तक घर ; नागरिकांनी लाभ घ्यावा चंद्रकांत पाटील यांचे आवाहन..

पुणे : pune city, kothrud लॉकडाऊनमध्ये बऱ्याच प्रमाणात वाचन संस्कृतीला चालना मिळाली. आता ही संस्कृती वाढीस लागावी यासाठी कोथरूडकरांसाठी पुस्तकघर उपक्रम सुरू करत असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील chandrakant patil यांनी केले. युवा सुराज्य प्रतिष्ठान आणि फ्लिपगार्ड कंपनीच्या माध्यमातून कोथरुडकरांसाठी हे फिरते पुस्तक घर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. असून या उपक्रमाच्या लोकार्पण प्रसंगी पाटील बोलत होते.

यावेळी पुणे शहर भाजपा सरचिटणीस दीपक पोटे, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, पुणे शहर भाजपा उपाध्यक्ष प्रशांत हरसुले, डॉ. संदीप बुटाला, चिटणीस अनिता तलाठी, शहर युवा मोर्चा सरचिटणीस अभिजीत राऊत, युवा सुराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि कोथरूड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, धनराज शिंदे, फ्लिटगार्डचे संजय कुलकर्णी, दिनेश माथवड, विठ्ठल बराटे, दुष्यंत मोहोळ, हर्षदा फरांदे, रमेश चव्हाण, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, वासंती ताई जाधव, हर्षाली माथवड, स्वप्नाली सायकर, माधुरी सहस्रबुद्धे, वृषाली चौधरी, नगरसेवक जयंत भावे, सचिन पाषाणावर, मिताली सावळेकर, उल्का मोकासदार, नवनाथ जाधव, प्रल्हाद सायकर, प्रकाश बालवडकर, अजय मारणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Img 20210906 wa0168 1

पाटील म्हणाले की, कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात घरात थांबावे लागल्याने वाचन संस्कृतीला नव्याने गती मिळाली. आता ही वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी प्रयत्न सुरू असून, त्याअंतर्गतच कोथरुडकरांसाठी फिरते पुस्तक घर सुरु केले आहे. आता हे पुस्तक घर कोथरूड मध्ये सर्वत्र फिरणार असून, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

समाज उपयोगी कामे मार्गी लावण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांचा सीएसआर फंडाची मदत घेणे शक्य आहे. त्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी एक व्यक्ती एक कंपनी असे, या तत्वाने काम केल्यास, अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविता येतील, असेही पाटील यावेळी सांगितले.

युवा सुराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भाजपा कोथरूड मंडलाचे अध्यक्ष पुनित जोशी यांनी फिरते पुस्तक घराबद्दल माहिती देताना सांगितले की, कोथरूड मध्ये सर्व भागात दररोज हे फिरते पुस्तक घर फिरणार असून, सोसायटीतील रहिवासी, वस्ती भागातील नागरीक सर्वांना याचा लाभ घेता येणार आहे. फ्लिटगार्डचे संजय कुलकर्णी म्हणाले की, वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी पुस्तक घर हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. त्यामुळे अशा उपक्रमांना कंपनीचे नेहमीच सहकार्य असेल.

Img 20210818 wa0002

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये