पुणे शहर

पुण्यातील राष्ट्रवादी पक्षातील सर्वच लोक आमच्यासोबत येतील- दीपक मानकर

पुणे : पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणखी मजबूत करण्याचे काम मी करणार असून पुण्यातील राष्ट्रवादी पक्षातील सर्वच लोक आमच्यासोबत येतील.असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी व्यक्त केला आहे.

दीपक मानकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर आज मानकर यांनी एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, लालमहाल येथील राजमाता जिजाऊ आणि शिवराय यांच्या स्मारकाला यासोबतच महात्मा फुले वाडा येथे महात्मा फुले, सावित्री बाई फुले स्मारक, पुणे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, केसरी वाडा येथे लोकमान्य टिळक स्मारक येथे भेट देऊन वंदन केले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, सामाजिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी नारायण पेठेतील गुप्ते मंगल कार्यालयात मानकर यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

मानकर म्हणाले, अजित दादांनी आणि पक्षाच्या वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी मी योग्य पद्धतीने पार पाडून दाखवेल. राजकारणात प्रवाहासोबत चालायला हवे. आम्ही अजित दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहोत.

त्यामुळे योग्य दिशेला निघालो आहे. येत्या काही दिवसांत शहरातील अन्य बाजूला गेलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमच्या सोबत येतील. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहरात नविन कार्यालय करण्याचा माझा प्रयत्न असेल.

Fb img 16887348074271349458389738939753
Img 20230707 wa00097391429386569165714
Img 20221228 wa00016208176808646242256
Img 20230511 wa0002281296351682306326034196

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये