पुणे शहर

पिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या अवमानाविरुद्ध निषेध मोर्चा

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, नेते सहभागी

पुणे : महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा आयुक्तांकडून झालेल्या अवमानाच्या निषेधार्थ पिंपरी- चिंचवड शहरात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी एकत्र येत भव्य निषेध मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने आंबेडकरी कार्यकर्ते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित नागरिक सहभागी झाले होते. या निषेध मोर्चाची सुरुवात राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यापासून झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध सभेने सांगता झाली.

मनपा आयुक्तांवर सात दिवसांत कारवाईचा इशारा
निषेध सभेत आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींनी एकमुखाने आयुक्तांवर सात दिवसांत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई न झाल्यास पिंपरी चिंचवड महापालिकेला “टाळा ठोको ” आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील देण्यात आला. सभेचे अध्यक्षस्थान आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते बाळासाहेब भागवत होते. यावेळी रिपब्लिकन चळवळीचे नेते सुरेश निकाळजे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे, दलित पॅंथरचे दीपक केदारी, पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, संतोष निसर्गंध, धर्मपाल तंत्रपाळे, कुणाल वावळकर, अजिजभाई शेख, बाळासाहेब रोकडे, विजय डोळस, संदिपान झोंबाडे, ज्ञानेश्वर कांबळे, गंगा धेंडे, सुप्रिया काटे, सिकंदर सूर्यवंशी, अंजना गायकवाड यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Img 20250811 wa0010773531396557201299

बनसोडे कुटुंबियांकडून आभार

बनसोडे कुटुंबियांच्या वतीने सिद्धार्थ बनसोडे यांनी विचारपीठावर उपस्थित राहून मोर्चात सहभागी समाज बांधवांचे आभार मानले. “आंबेडकरी जनतेने अण्णांसाठी दाखवलेले प्रेम आणि समर्थन आम्ही कधीही विसरणार नाही. जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध राहू,” अशा भावनिक शब्दांमधून मोर्चातील सहभागी बांधवांचे आभार व्यक्त केले.

कायदेशीर कारवाईसाठी तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संजय अवसरमल यांनी याप्रकरणी पिंपरी चिंचवड आयुक्त शेखर सिंह यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाईसाठी पोलीस उपायुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज देण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त श्री. आटोळे, पोलीस आयुक्त श्री. हिरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. धुमाळ तसेच श्री. कडलक यांनी मोर्चाच्या शिष्टमंडळाकडून निवेदन स्वीकारले.

Img 20250508 wa00018046597267745442111
Img 20240404 wa0013282295561886146142642027

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये