पुणे शहर

महाशिवरात्री निमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीत कर्वेनगर मधील विकास मित्र मंडळाच्या वतीने आयोजित महाआरती संपन्न…

पुणे : कर्वेनगर मधील विकास मित्र मंडळ आणि माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे, विठ्ठल बराटे यांच्या वतीने महाशिवरात्री निमित्त कर्वेनगर मध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांच्या उपस्थितीत हि महादेवाची महाआरती करण्यात आली.

कर्वेनगर मधील विकास मित्र मंडळ चौकामध्ये महाशिवरात्री निमित्त या  महाआरतीचे आयोजन कऱण्यात आले होते. यावेळी कर्वेनगर भागातील महिलांची उपस्थिती देखील मोठी होती. यावेळी आरती साठी उपस्थित भाविकांना महाप्रसाद म्हणून खिचडी चे वाटप करण्यात आले.

Fb img 17408331764587955985320585615354

यावेळी बोलताना विठ्ठल बराटे म्हणाले, महाशिवरात्री निमित्त विकास मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी मोठी सजावट करण्यात आली आहे. या निमित्ताने भाविक मोठ्या संख्येने आरतीला उपस्थित होते. यात महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच वयोगटातील लोकांनी उपस्थिती दाखवत एकतेचा संदेश दिला आहे.

Img 20240404 wa0017281298374058713843994116
Img 20240404 wa0013281293529802052601663206

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये