क्रीडा

उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारताकडून अमेरिका पराभूत, पीव्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत.


मुंबई : बँकॉकमध्ये सुरु असलेल्या थॉमस आणि उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारताने अमेरिकेला ४-१ने हरवलं आहे. यामुळे पीव्ही सिंधू आता उबेर कपच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे.

जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या ड गटातील लढतीत पीव्ही सिंधू विरुद्ध जेनी गाई असा सामना झाला. सिंधूने दोन्ही फेऱ्यात आपलं वर्चस्व राखलं आणि २६ मिनिटे चाललेल्या सामन्यात २१-१०, २१-११ असा विजय मिळवला आहे.

दुसऱ्या लढतीत तनिषा क्रास्टो आणि ट्रीसा जॉली या महिला दुहेरी जोडीने फ्रान्सिस्का कॉर्बेट आणि अॅलिसन ली हीचा २१-१९, २१-१० असा ३४ मिनिटे चालेल्या खेळात पराभव केला आहे. कोरियन आणि भारतीय महिला संघ उबेर कपच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. बुधवारी होणारा सामना अव्वल स्थान निश्चित करेल.

Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये